News Flash

राज्य शासनाच्या रोजगार मेळाव्यांकडे बेरोजगारांची पाठ

दोन महिन्यांत झालेल्या तीन मेळाव्यांना प्रतिसाद नाही

संग्रहित छायाचित्र

६४३१ जागांपैकी ३२३ जणांना संधी; दोन महिन्यांत झालेल्या तीन मेळाव्यांना प्रतिसाद नाही

राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्रांतर्गत बेरोजगारांसाठी नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. मात्र, पुण्यातील बेरोजगारांनी या मेळाव्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यांत रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून तब्बल ६४३१ उपलब्ध जागांपैकी ३२३ जणांना नोकरीची संधी मिळाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून पुण्याच्या औद्योगिक पट्टय़ातील कामगार, कर्मचारी मूळ गावी गेले आहेत. परिणामी कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला अनेक जणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. जिल्हा कौशल्य विकास रोजगार विभागाने दोन महिन्यांत तिसऱ्यांदा मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र, या मेळाव्यालाही आतापर्यंत अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. या मेळाव्यांमध्ये भारत फोर्ज, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, सॅमसोनाइट, शिंडलर, कमिन्स, युरेका, वनाज, ब्रिटानिया, कायनेटिक, ह्य़ुंडाई, एस्सार स्टील, एक्चेंजर अशा अनेक नामवंत कं पन्यांमध्ये बेरोजगारांना चांगल्या नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘पुण्यात करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मूळ गावी गेलेले कामगार, कर्मचारी परतलेले नाहीत. मात्र, दुसऱ्या बाजूला जिल्ह्य़ातील सर्व उद्योग, व्यवसाय पूर्ववत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता के ंद्राकडून बेरोजगारांसाठी नव्याने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, उमेदवारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ऑनलाइन मेळाव्यांची माहिती समाजमाध्यमे, लघुसंदेश, ई-मेद्वारे देऊन मुलाखती देखील ऑनलाइन घेतल्या जात आहेत. परंतु, प्रतिसाद अत्यल्प आहे, ’ अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

मेळाव्यांच्या तुलनेत नोकरीसाठी नोंदणी अत्यल्प

पहिला ऑनलाइन मेळावा २७०१ जागांसाठी १६ जून रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यापैकी २४ जणांना मुलाखतीनंतर संधी मिळाली आहे. या मेळाव्यानंतर जूनच्या अखेरीला ५३५ जागांसाठी दुसरा ऑनलाइन मेळावा घेण्यात आला. त्या अंतर्गत ९० व्यक्तींना नोकरीची संधी मिळाली. त्यानंतर ३१९५ जागांसाठी पुन्हा तिसरा मेळावा आयोजित के ला असून १७ ऑगस्टपर्यंत २०९ जणांना नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे तब्बल ६४३१ उपलब्ध जागांपैकी केवळ ३२३ जणांनाच रोजगार मेळाव्यांतून संधी मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 12:08 am

Web Title: unemployed people turn back to state government employment fairs abn 97
Next Stories
1 पृथ्वीच्या सर्वात जवळून गेलेल्या लघुग्रहाचा मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून शोध
2 पाहा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची लाईव्ह आरती
3 पुण्यात दिवसभरात ३५ रुग्णांचा मृत्यू,१ हजार ५५६ नवे करोनाबाधित
Just Now!
X