18 February 2019

News Flash

‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या सामग्रीची अज्ञातांकडून तोडफोड

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया'च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन सामग्रीची अज्ञतांनी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली

| July 20, 2015 02:07 am

‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन सामग्रीची अज्ञतांनी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली. गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करीत असलेल्या एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मुख्यप्रवेश द्वारासमोर निषेधार्थ फलक आणि लाकडाने तयार करण्यात आलेले एक भलेमोठे प्रश्नचिन्ह उभारले होते. या सर्व सामग्रीची अज्ञातांच्या टोळीने तोडफोड केली.
प्रवेशद्वाराजवळ उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांना सुरूवातीला काही कळलेच नाही. ते कोण होते याची काहीच कल्पना नाही, मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिल्यानंतर ते सर्व चाळीशीच्या आसपासचे व्यक्ती असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली असून आम्ही या घटनेबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे एफटीआयआयच्या एका विद्यार्थ्याने सांगितले.

ftii7

First Published on July 20, 2015 2:07 am

Web Title: unidentified persons vandalise student installation at ftii
टॅग Ftii