भारताच्या वैभवासाठी भारतीय समाजाची एकता महत्त्वाची आहे आणि त्याची वाटचाल आता गतिमान असायला हवी, असे प्रतिपादन आचार्य गोविंदगिरी यांनी पर्वतीवर आयोजित केलेल्या श्री शिवयागाच्या समारोप प्रसंगी केले.
श्री देवदेवेश्वर संस्थानाने श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या श्री शिवयागाचा समारोप आचार्य गोविंदगिरी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते. समारंभात पेशवे घराण्यातील वंशज उदयसिंह पेशवा, संस्थानचे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित, रुपी बँकेच्या प्रशासक मंडळाचे सदस्य डॉ. अच्युत हिरवे, महेश लडकत, संदीप खर्डेकर, हेमंत हरकरे, रमेश भागवत, यशवंत कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आचार्य गोविंदगिरी म्हणाले, की कोणीही व्यक्ती समाजापासून वेगळी राहू शकत नाही. व्यक्तीची उन्नती ही समाजासाठी केलेल्या त्यागामुळे होते. याग हा त्याग शिकवतो. व्यक्तीने समाजासाठी त्याग करावयास हवा ही गीतेची शिकवण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष, राजर्षी शाहू महाराजांची जयंती आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची पुआचार्य गोविंदगिरी म्हणाले, की कोणीही व्यक्ती समाजापासून वेगळी राहू शकत नाही. ण्यतिथी हा पवित्र त्रिवेणी संगम आहे. या निमित्ताने श्री देवदेवेश्वर संस्थानने आयोजित केलेला सर्व जातीसमावेशक श्री शिवयाग ज्याचे पौरोहित्यदेखील सर्व जातींमधील व्यक्तींनी केले आहे, हा एक उपक्रम नसून हे सामाजिक समरसतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. त्या बद्दल श्री देवदेवेश्वर संस्थानचे सर्व विश्वस्त अभिनंदनास पात्र आहेत.
यागाचे प्रयोजन सांगताना यागाचे यजमान सुधीर पंडित म्हणाले, की १९२९ साली साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली दलित आणि मागासवर्गीयांनी पर्वतीवरील मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केला होता. त्या वेळी प्रस्थापितांनी मोठा विरोध करुन तो अयशस्वी केला. त्या वेळी झालेल्या अपराधाचे परिमार्जनच संस्थानने योजलेल्या सर्वज्ञातीसमावेशक यागामुळे होत आहे. मंदिरे ही समाजाला संघटित करणारी प्रेरणास्थाने आहेत, अशी संस्थानची धारणा आहे. यागाचे पौरोहित्य नाशिक येथील राजेश दीक्षित आणि त्यांच्या शिष्यांनी केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 30, 2016 5:23 am