|| चिन्मय पाटणकर

विद्यापीठ अनुदान आयोगाची विद्यापीठांना सूचना

corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

विद्यापीठांतील पदवीप्रदान समारंभासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी हातमागाच्या कापडापासून तयार केलेले पोशाख वापरावेत, अशी आवाहनवजा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठांना पुन्हा एकदा केली आहे. हातमागाचे कापड वापरल्यामुळे भारतीय असल्याचा अभिमान वाटण्याबरोबरच हातमाग कापड उद्योगालाही बळ मिळेल, असे ‘यूजीसी’ने स्पष्ट केले आहे.

अनेक विद्यापीठांमध्ये पदवीप्रदान सोहळ्यात ब्रिटिशांच्या पद्धतीनुसार गाऊन आणि टोपी असा पेहराव केला जात होता. मात्र, काही वर्षांपासून त्यात बदल होत आहे. अशा कार्यक्रमात अस्सल भारतीय संस्कृतीचे प्रतििबब पडावे यासाठी भारतीय पोशाखाचा समावेश करून ब्रिटिश पद्धतीचा गाऊन-टोपी पोशाख हद्दपार केला जाऊ लागला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या काही विद्यापीठांनी आपल्या पदवीप्रदान पोशाखात बदल केला आहे.

आता पुन्हा ‘यूजीसी’ने २०१५ मधील परिपत्रकाचा संदर्भ देऊन देशभरातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना परिपत्रक पाठवले आहे. त्यात हातमागाचे कापड वापरण्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे. ‘हातमागाच्या कापडाचा वापर केल्याने देशातील हातमाग कापड उद्योगाला चालना मिळेल. तसेच उष्ण आणि दमट वातावरणात हे कापड जास्त सोयीचे ठरेल,’ असे ‘यूजीसी’ने नमूद केले आहे. विद्यापीठांना या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठवण्यासही सांगण्यात आले आहे.

२०१५ मध्येही आवाहन

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय किंवा यूजीसी यांनी पदवीप्रदान कार्यक्रमाचा पेहराव कसा असावा याबाबत कोणतेही नियम केलेले नाहीत. मात्र, ‘यूजीसी’ने २०१५ मध्येही परिपत्रकाद्वारे पदवीप्रदान आणि तत्सम कार्यक्रमांसाठी हातमागाच्या कापडाचा वापर करण्याची सूचना विद्यापीठांना केली होती.