03 March 2021

News Flash

पुण्यातील दापोडीत ७ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या

संशयित आरोपीने गळफास घेतल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

संग्रहित छायाचित्र

पिंपरी- चिंचवडमधील दापोडी येथे सात वर्षांच्या मुलीवर अज्ञात नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर नराधमाने मुलीची हत्या केली असून पीडित मुलीची आई ही कामावर गेली होती. तर बहीण शाळेत गेली असताना नराधमाने त्या चिमुकलीवर बलात्कार केला. या प्रकरणातील संशयित आरोपीनेही आत्महत्या केल्याने गूढ वाढले असून संशयित आरोपीच्या खिशात निरोध सापडला आहे.

सात वर्षांची पीडित मुलगी तिच्या आई आणि बहिणीसह दापोडी येथे राहते. मंगळवारी सकाळी पीडित मुलीची आई कामावर गेली होती. तर बहीण शाळेत गेली होती. पीडित मुलगी घरी एकटीच होती. यादरम्यान नराधम घरात घुसला आणि त्याने मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली.

आई कामावरून आल्यानंतर मुलगी बेडच्या खाली निपचित पडल्याचे निदर्शनास आले. तिने मुलीला घेऊन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय गाठले. तिथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. मयत मुलीची आई आणि संशयित आरोपी हे एका खानावळीत काम करायचे. रात्री दोघांचे भांडण झाले होते. ‘तुला उद्या बघून घेईन’, अशी धमकी त्याने मुलीच्या आईला दिली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. संशयित आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशमधील होता. तर मुलीची आई गेल्या सहा महिन्यांपासून खानावळीत भांडी धुण्याचं काम करत आहे.

पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असता त्याने सेमीई गेट जवळील झाडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस आल आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे.  या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार,  बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (पॉक्सो), हत्या अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 2:06 pm

Web Title: unknown man sexuallly abused 7 year old girl in dapodi
Next Stories
1 शनिवारवाडयाचा उघडलेला दिल्ली दरवाजा बघण्यासाठी पुणेकरांची गर्दी
2 पत्नीच्या फेसबुक अकाऊंटवरुन त्याने मित्राला मेसेज केला आणि…
3 पुणे : ताडिवाला रोड भागात पतीकडून पत्नी, अडीच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या
Just Now!
X