News Flash

पिंपरी-चिंचवड येथील थेरगावमध्ये अज्ञाताने नवी कोरी मोटार पेटवली

गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Mumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.

पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथे अज्ञात इसमाने चारचाकी गाडी पेटवल्याची घटना घडली. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद शेख (वय २८ रा. शिवराज वसाहत,संदीप नगर, थेरगाव ) यांनी नवी कोरी चारचाकी गाडी घरासमोरील रस्त्याच्या एका बाजूला उभी केली होती. मध्यरात्री अज्ञात इसमाने ती पेटवून दिली. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

शेजारी राहणाऱ्या प्रशांत रावळकर यांच्या ही बाब लक्षात आली. प्रसंगावधन दाखवत त्यांनी शेख यांना उठवले. त्यानंतर गाडीला लागलेली आग विझवण्यात आली. रस्त्यावर गाडी पार्क केल्याने नागरिकांना अडचण होते. याच कारणावरुन अज्ञात इसमाने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. वाकड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 2:49 pm

Web Title: unknown person fire vehicle in pimpri chinchwad thergaon
Next Stories
1 स्वच्छतागृहांवर हातोडा नको!
2 सहा महिन्यांच्या अभ्यासातून ब्रह्मणस्पती मंदिर साकारले
3 नामवंतांचे बुकशेल्फ : काळाप्रमाणे वाचनाची माध्यमे बदलली
Just Now!
X