14 October 2019

News Flash

पुणे – मदत केली म्हणून तिने मानले आभार, त्यानं घेतलं चुंबन

पुण्यामध्ये एका तरूणीचा रस्ता चुकला, त्यात मोबाईलही बंद.

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यामध्ये एका तरूणीचा रस्ता चुकला, त्यात मोबाईलही बंद. रस्त्यात चुकल्याची माहिती मित्राला द्यायची होती. त्यामुळे रस्त्यानं जाणाऱ्या तरूणाकडे तिनं मदत मागितली. त्याच्याकडून मोबाईल घेऊन तिच्या मित्राला फोन करते अन् रस्ता चुकल्याचे कळवते. बोलून झाल्यानंतर मोबाईल परत देत तरूणाचे आभार मानते. त्यासाठी शेकहँड करण्यासाठी तिने हात पुढे केला. मात्र, त्यावेळी तो तरूण तिचा हात पकडतो आणि तिला ‘किस’ करतो. पुण्यातील कॅम्प परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी २१ वर्षीय तरुणी बालेवाडी येथील असून. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प येथील अरोरा टॉवर परिसरात काल दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास एका २१ वर्षीय तरुणीच्या जवळचा फोन स्विच झाल्याने तिने एका व्यक्तीला मित्राला फोन करायचा आहे. त्यावर त्याने तिला फोन दिला. काही मिनिट फोनवर बोलणे झाल्यानंतर त्या व्यक्तिला तिने थँक्स म्हटली. तेवढ्यात त्याने त्या तरुणीला किस केल्याची घटना घडली. यामुळे ती गोंधळून गेली आणि तेथून आरोपी पसार झाला. यानंतर त्या तरुणीने मित्राला फोन करून बोलवून घेतले आणि घडलेल्या प्रकारची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

First Published on May 15, 2019 2:38 pm

Web Title: unknown person kissing girl in pune fir register