News Flash

चोरी करायला गेला आणि आगीत होरपळून मेला!

वाकड पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत

प्रतिनिधिक छायाचित्र

रविवारी दुपारी पाऊणच्या सुमारास विद्युत डीपी ला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता.अद्याप त्या व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाही.परंतु,अज्ञात व्यक्ती डीपी मधील तांब्याच्या कॉपरच्या पट्ट्या चोरण्यासाठी गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

सविस्तर माहिती अशी की,काळेवाडी येथे रविवारी दुपारी अचानक विद्युत डीपीला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली, तातडीने घटनास्थळी येऊन आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.मात्र विद्युत डीपी मध्ये एक व्यक्ती होरपळून तिथेच पडला असल्याचे निदर्शनास आले.दरम्यान,हा अज्ञात व्यक्ती कोण आहे याची माहिती अद्यापही मिळाली नाही.मात्र तो चोर असावा असा संशय वाकड पोलिसांनी व्यक्त केला आहे.त्या ठिकाणी तो कॉपर च्या पट्ट्या चोरायचा गेला असावा त्यात त्या विद्युत डीपीची क्षमता ही २२ हजार होल्ट ची होती.ते त्याच्या लक्षात आले नाही.त्याने तिथूनच विद्युत पुरवठा खंडित करत कॉपर च्या पट्ट्याना हात घातला आणि यातच स्फोट होऊन त्याचा होरपळून मृत्यू झाला आहे.सामान्य डीपी मधून कॉपर च्या पट्ट्या काढता येतात.त्यामुळे त्याने थेट हात घातला असावा असं सांगण्यात येत आहे.कॉपर तांब्याच्या पट्ट्यांची किंमत ही ४०० किलो आहे.या घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 4:57 pm

Web Title: unknown thief stuck in power dp and dead because of fire in pimpri
Next Stories
1 पंतप्रधान होण्याची आशा बाळगत ‘हा’ फकीर पुणेकरांकडे करतोय मदतीची याचना
2 पुण्यात मसाल्याच्या कारखान्याला आग
3 पुणे- उड्डाण पुलावर साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा तरुणाचा प्रयत्न
Just Now!
X