09 March 2021

News Flash

‘अप्रकाशित पु. ल.’चे शुक्रवारी प्रकाशन

हास्य फुलवणारे, अंतर्मुख करणारे बहुरंगी, बहुढंगी लेखन

हास्य फुलवणारे, अंतर्मुख करणारे बहुरंगी, बहुढंगी लेखन

‘आजही पावसात भिजून कुडकुडणारं कुलुंगी कुत्रं पाहिलं की त्या कुत्र्यासारखंच अनिकेत जीवन जगणारा, भुकेने व्याकूळ झालेला, त्या कुत्र्यासारखाच केविलवाण्या डोळ्यांनी जगाकडे पाहणारा चॅप्लिन दिसायला लागतो. धनदांडग्यांकडून सतत बदडला जाणारा, नाना क्लृप्त्या करून स्वत:ची सुटका करून घेणारा, पोराबाळांना पोटभर हसायला लावणारा आणि थोरांना हसता हसता अंतर्मुख करून डोळ्यांच्या कडा भिजवणारा हा विदूषक आपल्या एकापेक्षा एक सरस चित्रपटांतून देश, धर्म, स्थळ, काळ, हजारो भिन्न भिन्न भाषा यांच्या सीमा ओलांडून साऱ्या जगाचा नागरिक झाला..’ विनोदवीर चार्ली चॅप्लिन यांच्याविषयीची ही भावना आहे पु. ल. देशपांडे यांची!

सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे आणि निखळ विनोदासह भावगर्भ आशयातून अंतर्मुख करणारे पुलंचे बहुरंगी, बहुढंगी लेखन ‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकातून वाचकांपुढे येत आहे. या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी (३० नोव्हेंबर) सायंकाळी ५.३० वाजता विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.

पु. ल. आणि सुनीताबाई यांचे मानसपुत्र डॉ. दिनेश आणि त्यांच्या पत्नी ज्योती यांनी पुलंचे अप्रकाशित साहित्य ‘लोकसत्ता’ला उपलब्ध करून दिले. पुलंच्या जन्मशताब्दी वर्षांत प्रकाशित होणारा ‘अप्रकाशित पु. ल.’ हा विशेषांक समस्त पुलप्रेमींसाठी अनोखी भेट ठरेल. प्रकाशनाच्या कार्यक्रमात कविवर्य केशवसुत आणि पु. शि. रेगे यांच्या कवितांवर आधारित पुलंनी लिहिलेल्या संहितेचे अभिवाचन अभिनेता सचिन खेडेकर करणार आहे. या काव्यमैफलीतून पुलंच्या नजरेतून केशवसुत आणि पु. शि. रेगे यांच्या कवितांचा आस्वाद घेण्याची दुर्मीळ संधी रसिकांना मिळेल.

या कार्यक्रमाचे सहप्रायोजक व्हीटीपी रिअ‍ॅलिटी, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लि. आणि पितांबरी आणि पॉवर्ड बाय मँगो हॉलिडेज आणि पु. ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स यांच्या सहकार्याने ‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा रंगणार आहे.

बालगंधर्व रंगमंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पुलंनी भाषण केले होते. त्या भाषणात पुलं म्हणतात, ‘रंगभूमीवर नवे प्रयोग करणाऱ्या अव्यावसायिक मंडळांना आपली नाटके उभी करणे कसे शक्य होईल, याचा विचार करून त्यांना बालगंधर्व रंगमंदिराने म्हणजे महानगरपालिकेने काही सवलती दिल्या पाहिजेत. कारण थिएटरला मागणी आहे म्हटल्यावर एक चांगली सांस्कृतिक चळवळ म्हणून या रंगमंदिराकडे पाहण्याऐवजी उत्पन्नाचे साधन म्हणून पाहण्याकडे प्रवृत्ती वाढण्याची भीती असते. बालगंधर्व रंगमंदिराच्या इमारतीच्या उभारणीला झालेल्या खर्चाकडे ‘इन्व्हेस्टमेंट’ म्हणून पाहणे अयोग्य आहे. भांडवल गुंतवणे आणि त्या भांडवलातून मिळणाऱ्या नफ्याचे गणित मांडणे हा व्यापारी विचार इथे असून चालणार नाही. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या पुतळ्याला समजा जो काही लाख-दोन लाख रुपये खर्च झाला असेल, ती जशी भांडवलाची गुंतवणूक मानून त्याचे ‘रिटर्न’ काय, असा प्रश्न विचारणे चूक आहे. त्याचप्रमाणे बालगंधर्व रंगमंदिरातून आर्थिक रिटर्नची अपेक्षा व्यापारी गणित मांडून करणे चुकीचे आहे. नव्हे त्या महान कलावंताच्या भव्य स्मारकाचा मूळ हेतूच डावलल्यासारखे आहे.’

  • ‘अप्रकाशित पु. ल.’ विशेषांकाचे प्रकाशन
  • कधी : शुक्रवार, ३० नोव्हेंबर २०१८, सायंकाळी ५.३० वाजता
  • कुठे : टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, सदाशिव पेठ, पुणे

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 12:48 am

Web Title: unpublished p l deshpande literature by loksatta
Next Stories
1 नक्षली संबंध: संशयितांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ
2 अयोध्येच्या मुद्द्यावर सरकार देशात दंगली घडवण्याच्या तयारीत-प्रकाश आंबेडकर
3 मुंबई परप्रांतीयांना आंदण दिली का?-राज ठाकरे
Just Now!
X