News Flash

गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच आगामी महापालिका निवडणूक लढणार

चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन गुरुवारी करण्यात आले.

अपंग आणि आजारी व्यक्तींना घरोघरी जाऊन करोना प्रतिबंधक लस देण्याचा उपक्रम कसबा विधानसभा मतदार संघात सुरू करण्यात आला आहे

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच पुणे महापालिके ची पुढील वर्षी होणारी निवडणूक लढविण्यात येणार आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी जाहीर के ले. भाजपमध्ये कोणतेही गट नाहीत, असा दावाही त्यांनी के ला.

अपंग आणि आजारी व्यक्तींना घरोघरी जाऊन करोना प्रतिबंधक लस देण्याचा उपक्रम कसबा विधानसभा मतदार संघात सुरू करण्यात आला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, हेमंत रासने, गणेश बीडकर, राजेश पांडे यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात के ली.  पक्षाचे शहरासाठी नेतृत्व करणारे खासदार गिरीश बापट यांची ताकद कमी झाल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली होती. यासंदर्भात पाटील यांना विचारले असता त्यांनी ही घोषणा के ली.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अप्सरा चित्रपटगृह ते वखार महामंडळ यादरम्यानच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी पाटील यांनी शिवसेनेवर टीका के ली. ‘आमची मैत्री जंगलतल्या वाघाशी आहे, पिंजऱ्यातील वाघाशी नाही. सध्याची शिवसेनेची अवस्था पिंजऱ्यातील वाघासारखी झाली आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर मैत्री करण्याची हौस नाही,’ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 1:00 am

Web Title: upcoming pmc election will fight under the leadership of girish bapat says chandrakant patil zws 70
Next Stories
1 धक्कादायक! पुण्यात आजारी वडिलांची गळा चिरून हत्या
2 पिंपरी चिंचवड : KYC च्या नावाखाली तरुणीचे दीड लाख लुटले; QR Code, Links च्या माध्यमातून फसवणुकीत वाढ
3 “वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला!
Just Now!
X