News Flash

४८९ पोलिसांनी एकत्रितपणे घेतला ‘उरी’ चित्रपटाचा आस्वाद

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने केले विशेष शोचे आयोजन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी आज ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या हिंदी चित्रपटाचा आनंद घेतला. येत्या शनिवारी असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या खास शोचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस म्हटलं की नेहमीचाच ताण- तणाव, गुन्ह्यांचा तपास इ. याच तणावातून मुक्त आणि आनंदी वातावरण तसेच मनोरंजन यासाठी ‘उरी’ हिंदी चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. आकुर्डी येथील आयनॉक्स चित्रपटगृहात हा आयोजित केला होता. गणवेशात उपस्थित असलेल्या ४८९ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी या चित्रपटाचा आस्वाद घेतला. यावेळी दोन्ही परिमंडळ,वाहतूक पोलीस,मुख्यालय येथील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून भारताच्या सूडाची कहाणी सांगण्यात आली आहे. विकी कौशल आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. बॉक्स ऑफीसवर ‘उरी’ला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. जम्मू- काश्मीरमधील उरी मधील लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.

देशभक्तीपर असलेल्या चित्रपट आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना दाखवण्याच वरिष्ठांनी ठरवले होते. त्याप्रमाणे आज आकुर्डी येथे ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाचे आयोजित करण्यात आले होते. हा चित्रपट देशभक्तीपर असल्याने चित्रपटाच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत चांगला संदेश पोहचावा या उद्देशाने शोचे आयोजन करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या. पोलिसांना आपल्या सहकाऱ्यांबरोबर चित्रपट पाहण्याचा योग क्वचितच येतो. आज मात्र या सर्वांनी मिळून एकत्रितपणे चित्रपटाचा आस्वाद घेतला. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 7:34 pm

Web Title: uri the surgical strike movie special show for police in pimpri chinchwad akurdi inox theater
Next Stories
1 आजी-आजोबांना भेटण्यासाठी नातवाने चोरली दुचाकी
2 अभिमानास्पद! पुण्यातील १२ वर्षीय मुलाने लावला समुद्रातील प्लास्टिक काढण्याच्या तंत्रज्ञानाचा शोध
3 अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या
Just Now!
X