News Flash

पुण्यातील ‘अंघोळीच्या गोळी’ची अमेरिकन नागरिकांनी घेतली दखल; निमित्त ठरले ट्रम्प

... म्हणून ट्रम्प यांना भारताबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, पाटील यांचा पुणेरी शैलीत टोला

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे अनेक कारणांमुळे आणि आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत होते. भारतातील हवा प्रदुषित आहे, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं होतं. त्यांच्या विधानाचा सोशल मीडियावरही दखल घेण्यात आली होती. तर याच विधानावर पुण्यातील आंघोळीची गोळी उपक्रम राबविणारे माधव पाटील म्हणाले की, “पर्यावरणाच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्र संघाने अनेक देशांसोबत पॅरिस करार केला आहे. मात्र या करारातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली.” त्यामुळे भारतातील प्रदूषणाबाबत ट्रम्प साहेब आपणास बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत पुणेरी शैलीत माधव पाटील यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला.

“राज्यात २०१५ मध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा मराठवाडा, विदर्भात १५ दिवसातून पाणी येते. तेथील मावशीसाठी आंघोळीची गोळी आम्ही उपक्रम हाती घेतला. आठवड्यातून एक दिवस आंघोळ करायची नाही असा उपक्रम हाती घेतला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला. त्यानंतर अनेक उपक्रम हाती घेतले. त्या प्रत्येक उपक्रमास नागरिकांनी प्रतिसाद दिला,” असं यावेळी माधव पाटील म्हणाले.

“आम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने आंघोळीची गोळी उपक्रम राबवित होतो. त्याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संयुक्त राष्ट्र संघाच्या पॅरिस करारातून माघार घेतली. तेव्हा त्यांची ही भूमिका आम्हाला खटकली. आम्ही सर्वासाठी आंघोळीची गोळी हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून हवामानातील होणारे बदल कमी होण्यास मदत होणार आहे. हा एक आमचा छोटासा प्रयत्न होता. या उपक्रमाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळतोय,” असंही त्यांनी सांगितलं. पण त्याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या प्रदूषणाबाबत एक विधान केलं. त्या बद्दल सांगायचे झाल्यास, भारताच्या प्रदूषणाबद्दल बोलण्याचा ट्रम्प यांना नैतिक अधिकार नाही. कारण ते संयुक्त राष्ट्र संघाच्या पॅरिस करारात सहभागी नाही. तसेच या करारात जगातील १९७ देश आहेत. हे सर्व देश पृथ्वी वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना. ट्रम्प यांच्या आजवरच्या कृतीतून संकुचित वृत्ती दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्राध्यक्षांनी पाठपुरावा करावा

“आपल्या देशातील प्रदूषणबाबत केलेल्या विधानानंतर मी एक व्हिडिओ केला. तो व्हिडीओ अमेरिकेमधील नागरिकांनी सर्वाधिक पहिला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहे. जे काही असो, पण पॅरिस करारात अमेरिकेनं सहभागी व्हावं, अशी आमची इच्छा असून सध्याच्या निवडणुकीत जे कोणी निवडून येतील त्या राष्ट्राध्यक्षांनी पॅरिस करारामध्ये सहभागी होण्याबाबत पाठपुरावा करावा,” असंही पाटील यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 3:18 pm

Web Title: us presidential election pune angholichi goli shares video about donald trump pollution in india statement paris contract svk 88 jud 87
Next Stories
1 पुणे परिसरातील कंपन्या पूर्वपदावर
2 भुसार बाजारात दिवाळी खरेदीची लगबग
3 कासारवाडीतील नाशिकफाटा चौक धोकादायक
Just Now!
X