25 January 2021

News Flash

भाजी मंडईचा वापर वाहनतळासाठी

वडगांवशेरी येथे पावसाळी गटारे करण्यात आली आहेत.

वडगांव शेरीतील भाजी मंडईमध्ये वाहने लावली जातात.

|| अविनाश कवठेकर

पावसाळी वाहिन्यांची चुकीच्या पद्धतीने झालेली कामे, त्यामुळे पावसाळ्यात घरात शिरणारे पाणी, सातत्याने फु टणाऱ्या जलवाहिन्या, रखडलेले रस्ते अशा असुविधा महापालिके च्या वडगांवशेरी-कल्याणीनगर या प्रभाग क्रमांक पाचमध्ये आढळून येत आहेत. गेल्या चार वर्षांपासून रस्त्यांची कामे रखडली असतानाच आठ ते दहा लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या भाजी मंडईमध्ये सध्या दुचाकी आणि चारचाकी गाडय़ा लावण्याचे प्रकार घडत आहेत. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठीही या जागेचा वापर होत असल्याचे दिसून येत असून त्याकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वडगांवशेरी-कल्याणीनगर प्रभातील समस्या कायम राहिल्या आहेत.

बैठी घरे, सोसायटय़ा, गावठाण असे स्वरूप असलेल्या वडगांवशेरी-कल्याणीनगर प्रभागातील चारही नगरसेवक सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कं पन्या या प्रभागात आहेत. पाणीप्रश्न, रस्ते, कचरा समस्या, मोकळ्या जागा, अतिक्रमणे अशा विविध प्रकारच्या समस्या या प्रभागात दिसून येतात. नदीपात्रातील शिवणे-खराडी रस्ता, बिशप शाळा ते सनसिटी हा रस्ता अर्धवट आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते वडगांवशेरी फाटा, गणेशनगर मुख्य रस्ता, टेम्पो चौकातील रस्ते भूसंपादना अभावी रखडले आहेत. जुना मुंढवा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. मोकाट श्वान, वराह यांचाही मोठा उपद्रव नागरिकांना होत आहे. मोकळ्या जागेत कचरा टाकण्याचे प्रकार सर्रास आढळून येत आहेत.

वडगांवशेरी येथे पावसाळी गटारे करण्यात आली आहेत. मात्र त्यांची कामे चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. कामे चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळेच पावसाळ्यात पावसाचे पाणी घरात शिरत आहे. त्यावर काँक्रिीटकरण करण्यात आले आहे. बऱ्याच ठिकाणची कामे दोन ते तीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहेत. रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे पाणी, सांडपाणी वाहिन्या फु टण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रभागातील नागरिकांसाठी उद्याने उभारण्यात आली असली तरी त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची उद्याने के वळ नावालाच असून त्यांचा गैरवापर होत आहे.

वडगांवशेरी जवळील साईनगर या नदीपात्रालगतच्या हरित क्षेत्रातील अतिक्रमणे ही समस्याही नागरिकांना भेडसावत आहे. हरित क्षेत्र असूनही येथे अनधिकृतपणे शेकडो टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. कचऱ्याची समस्या असतानाही या भागात कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सक्षमपणे राबिवले जात नाहीत. दुमजली वाचनालयाची इमारतही धूळ खात पडून आहे. उद्याने, भाजी मंडई, मैदाने असली तरी त्याचा त्याच कारणांसाठी अपेक्षित वापर होत नसल्याचे चित्र आहे. प्रभागातील पाणी टंचाई लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी या भागात विंधन विहिरी घेण्यात आल्या. मात्र त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यामुळे त्या बंद पडल्या आहेत. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर उभारण्याचे नियोजित असले तरी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने ठोस कार्यवाही झालेली नाही. के वळ वास्तू उभारणीवरच नगरसेवकांचा भर असल्याचे दिसून येत आहे.

लोकप्रतिनिधी म्हणतात

महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. साईनाथनगर येथे नव्याने उद्यान विकसित करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. लाईट हाऊस प्रकल्पाचे कामही सुरू असून येत्या काही दिवसांत तो कार्यान्वित होईल. प्रभागाच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.  – सुनीता गलांडे, नगरसेविका

नगर रस्त्यावरून वडगावंशेरी मध्ये येणारा रस्ता रुंद करण्यात आला आहे. तो १८ फु टी झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली आहे. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी वडगांवशेरी गावात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी उद्यानात विविध विकासकामे करण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे.  – शीतल शिंदे, नगरसेविका

राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. याच उद्यानात सेव्हन डी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. शिवसृष्टीचे कामही प्रगतिपथावर असहे. बिशप शाळेजवळील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला असून जुना मुंढवा रस्ता १८ कोटी रुपये खर्च करून बांधला आहे.   – योगेश मुळीक, नगरसेवक

प्रभागातील विकासकामे करण्यासाठी चारही नगरसेवक एकत्रितपणे त्यांचा विकास निधी देतात. त्यामुळे निधी अभावी कोणतीही कामे अडकून राहिलेली नाहीत. पाणी, कचरा, सांडपाणी वाहिन्या, वाहतूक कोंडी आदींच्या संबंधातील कामे सुरू आहेत. रस्ता रुंदीकरणाला प्राधान्य दिले आहे. जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत.   – संदीप जऱ्हाड, नगरसेवक

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

जुनी चांगली कामे बंद करण्यात येत आहेत. के वळ नावे देण्यातच नगरसेवकांना रस आहे. प्रभागात अनेक समस्या आहेत, त्यावर ठोस कार्यवाही होत नाही. वडगांवशेरी स्मशानभूमीत असुविधा आहेत. त्या दूर करण्याऐवजी कमान उभारण्यात आली आहे, हे त्याचे बोलके उदारहरण आहे. रस्तेही अर्धवट आहेत. रुग्णालयातही सुविधा नाहीत.  – सचिन भगत, शिवसेना

पाणी, नाले, पावसाळी गटारांचा मोठा प्रश्न या प्रभागात अद्यापही कायम आहे. सेवा क्षेत्रासाठी राखीव जागेत (अ‍ॅमिनिटी स्पेस) वास्तू बांधण्यात आल्या असल्या तरी त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. कल्याणीनगर भागातील पदपथांवर अतिक्रमणे झाली आहेत. वाहतुकीचा प्रश्नही कायम आहे. महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.    – नारायण गलांडे, राष्ट्रवादी काँग्रेस

नगरसेवकांचे दावे

– पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना
– रस्ता रुंदीकरणाला प्राधान्य
– पावसाळी गटारांची कामे वेगात
– मोकळ्या जागांचा सुयोग्य वापर
– महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम

नगरसेवक

– सुनीता गलांडे ल्ल शीतल शिंदे
– योगेश मुळीक ल्ल संदीप जऱ्हाड

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

गणेशनगरचा काही भाग, वडगांवशेरी गावठाण, राजश्री कॉलनी, सोमनाथनगरचा काही भाग, महावीरनगर, यशवंतनगर, सैनिकवाडी, सनसिटी परिसर, कल्याणीनगर, हरीनगर, टेम्पो चौक, नवरत्न परिसर, माळवाडी, गलांडेनगर, वाडेश्वरनगर, साईनाथनगर, आदर्शनगर, रामवाडी.

नागरिक म्हणतात

वडगांवशेरी, कल्याणीनगर परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने जाणवतो. त्यादृष्टीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत. पाणी प्रश्नही येथे मोठा आहे. पाण्यासाठी अनेकदा टँकरवर अवलंबून रहावे लागते. अतिक्रमणांमुळे चालण्यात अडथळे येत आहेत. पावसाळ्यात सोसायटय़ांमध्ये पाणी शिरते. सततच्या कामांमुळे रस्त्यांना सलगता नाही.   – दीपेश कदम, वडगांवशेरी

रस्ता रुंदीकरणाची कामे होत असली तरी त्यातून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत, याचा विचार होणे अपेक्षित आहे. पदपथांवर, रस्त्यांवर, प्रमुख चौकात भाजी विक्रे ते सातत्याने बसतात. कारवाई झाल्यानंतरही पुन्हा तोच प्रकार दिसून येतो. पार्किं गचाही मोठा प्रश्न दिसून येतो.   – हर्षद देशमुख, कल्याणीनगर

तक्रारींचा पाढा
– रस्ते अधर्वट अवस्थेत
– वास्तूंचा गैरवापर
– वस्ती भागात सांडपाण्याचा प्रश्न
– नदीपात्रातील जागांवर अतिक्रमणे
– खाद्यपदार्थ गाडय़ांचा त्रास

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 1:20 am

Web Title: use of vegetable market for parking mppg 94
Next Stories
1 राज्यात संक्रांतीपर्यंत थंडीचे पुनरागमन
2 शेतकरी आंदोलनाचा बासमतीला फटका
3 भाजपा-राष्ट्रवादीतील राजकारणामुळे अखेर पंतप्रधान आवास योजनेची सोडत रद्द
Just Now!
X