07 April 2020

News Flash

उस्ताद सईदुद्दीन डागर यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर

पुणे महापालिकेतर्फे ज्येष्ठ धृपदगायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांना यंदाचा बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला आहे.

उस्ताद सईदुद्दीन डागर

पुणे महापालिकेतर्फे ज्येष्ठ धृपदगायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांना यंदाचा बालगंधर्व पुरस्कार जाहीर झाला आहे. ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बालगंधर्व जयंतीचे औचित्य साधून २६ जून रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात उस्ताद डागर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात संगीत नाटकाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, नाटय़निर्माता वीरेंद्र जाधव, पखवाजवादक शशिकांत भोसले, नाटय़चळवळीतील कार्यकर्ता पांडुरंग ऊर्फ मामा शेलार आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारा अभिनेता अशा पाच रंगकर्मीचा प्रत्येकी ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारी दिली.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्याचा विषय हा पुरस्कार समितीकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, ‘सैराट’ चित्रपटातील आकाश ठोसर आणि पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरलेली रिंकू राजगुरु यांच्यासह सर्व कलाकारांचा सत्कार करण्याचा विषय पक्षनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे, असेही जगताप यांनी सांगितले.

अजय-अतुल जोडीचाही सन्मान
संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अजय-अतुल या जोडीचाही महापालिकेतर्फे विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या दोघांनी केवळ मराठीच नव्हे तर, हिंदूी आणि दाक्षिणात्य चित्रपटांसाठीही संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. या सांगीतिक कारकीर्दीबद्दल अजय-अतुल यांना गौरविण्यात येणार असून हा ठराव पक्षनेत्यांच्या बैठकीत मंजूर झाला असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2016 1:56 am

Web Title: ustad sayeeduddin dagar to get bal gandharva award
Next Stories
1 ‘लहान व्यावसायिकांपुढे ‘मॉल’, ‘ई-कॉमर्स’चे आव्हान’
2 कविता म्हणजे माझ्या जीवनाचे अध्यात्म
3 कलावंत उपाशी मरत असताना मुख्यमंत्र्यांना पोटभर जेवण्याचा अधिकार नाही
Just Now!
X