कोव्हॅक्सिन लशीसाठी सहा स्वतंत्र केंद्रे

पुणे :  शहरातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या शनिवारच्या लसीकरणासाठी महापालिके ने एकू ण १९१ केंद्र निश्चित केली आहेत. यापैकी १८५ केंद्रांवर कोविशिल्ड, तर कोव्हॅक्सिन लस स्वतंत्र ६ केंद्रांवर दिली जाणार आहे. या सर्व केंद्रांमध्ये लशीची पहिली आणि दुसरी मात्रा दिली जाणार आहे.

कोविशिल्ड लशीसाठी सर्व केंद्रांना प्रत्येकी १०० मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. केंद्रांना उपलब्ध लशीच्या साठय़ापैकी ४० टक्के  लस पहिली मात्रा म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. २० टक्के  नागरिकांना थेट केंद्रात नाव नोंदणी के ल्यानंतर लस दिली जाणार आहे. ३० एप्रिलपूर्वी पहिली मात्रा घेतलेल्या २० टक्के नागरिकांना ऑनलाइन नावनोंदणी, तर २० टक्के  नागरिकांना थेट केंद्रात नावनोंदणी के ल्यानंतर दुसरी मात्रा दिली जाणार आहे. ऑनलाइन बुकिं ग शनिवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.

कोव्हॅक्सिनच्या प्रत्येक केंद्राला लशीच्या तीनशे मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी के लेल्या २० टक्के  नागरिकांना, तर २० टक्के  नागरिकांना थेट नावनोंदणी के ल्यानंतर पहिली मात्रा दिली जाईल. पंचवीस जूनपूर्वी कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांना दुसरी मात्रा दिली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी के ल्यानंतर ४० टक्के  लस दिली जाणार असून थेट नावनोंदणी के लेल्या २० टक्के  नागरिकांना दुसरी मात्रा दिली जाणार आहे.