पुणे : करोना लसीकरण केंद्रांमध्ये अपात्र नागरिकही आरोग्य सेवक आणि आघाडीचे कर्मचारी म्हणून घुसखोरी करून लसीकरणाचा लाभ मिळवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दोन्ही लाभार्थी गटात नवीन नोंदणी बंद करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी काढले आहेत.

राजेश भूषण यांनी नुकतेच याबाबतचे पत्र सर्व राज्य सरकारांना पाठवले आहे. मागील काही दिवसांमध्ये आरोग्य सेवक आणि इतर आघाडीच्या कर्मचारी गटांमध्ये नाव-नोंदणी करून लसीकरण लाभ मिळवले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आरोग्य सेवक आणि इतर आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीसंचात (डेटाबेस) तब्बल २४ टक्के  वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ही बाब के ंद्रीय आरोग्य आणि कु टुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली असून त्यामुळे यापुढे आरोग्य सेवक आणि आघाडीचे कर्मचारी गटातील लसीकरण नावनोंदणी बंद के ली जाणार आहे. ४५ वर्षांवरील लाभार्थी को-विन अ‍ॅपद्वारे नोंदणी करून लसीकरणाचे लाभ घेऊ शकतील, असेही राजेश भूषण यांनी आपल्या आदेशातून स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात अपात्र लाभार्थी आरोग्य सेवक किं वा इतर क्षेत्रातील आघाडीचे कर्मचारी म्हणून लस घेत असल्याचे दिसून आल्यामुळे हा आदेश काढण्यात आला आहे.