जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा कोणाला भेटण्यासाठी अगदी सहज एखादे हॉटेल ठरवले जाते. यामध्ये तरुणाईचा सहभाग सर्वात जास्त असल्याचे दिसते. पुण्यातील हॉटेल्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिशय नामांकित अशा हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे नुकतचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. वैशाली, रुपाली आणि कॅफे गुडलक यांसारखी हँगआऊटसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल्सचा या यादीत समावेश आहे. या हॉटेलचे भटारखाने अतिशय गलिच्छ असल्याचे एफडीएने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

हॉटेलच्या स्वच्छतेबाबत एफडीएचे काही निकष असतात. हे निकष हॉटेल्सकडून पाळण्यात येतात का याची पाहणी करण्यासाठी एफडीएने अचानक पाहणी केली असता याठिकाणी अस्वच्छता असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सिझलर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या याना सिझलर्सचाही समावेश आहे. वैशाली हॉटेलच्या भटारखान्यात मोठ्या प्रमाणात कचरा होता, तसेच याठिकाणी अन्नपदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारी भांडीही खराब अवस्थेत असल्याचे या पाहणीत समोर आले आहे. आपल्याला चमचमीत पदार्थ बनवून देणारे शेफही स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. रुपाली हॉटेलची स्थितीही अशीच असल्याचे समोर आले.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Central Government Launches Dekho Apna Desh People s Choice 2024 Survey
देशातलं कोणतं पर्यटनस्थळ ठरणार सर्वांत लोकप्रिय? होणार ऑनलाइन मतदान!
market is loaded with cakes candies chocolates for Easter festival
ईस्टर सणासाठी बाजारात केक, कॅन्डी, चॉकलेटची रेलचेल
This pictorial story of Lalbagh Botanic Garden during both Bangalore and Bangalore eras
निर्जळगावातलं निसर्गबेट

तर मध्य वस्तीतील प्रसिद्ध असणारे कॅफे गुडलक हे इराणी हॉटेलही अतिशय अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. याठिकाणच्या स्वयंपाकघरात कोळ्यांची जाळी आणि कचरा आढळला. या अस्वच्छ कारभारामुळे एफडीएने या हॉटेल्सना नोटीस दिली असून एफडीएचे नियम पाळावेत असे सांगण्यात आले आहे. तर एफडीएचे सर्व नियम पाळणे अवघड असल्याचे वैशालीचे मालक शेट्टी यांनी सांगितले. एफडीएने अशाप्रकारे अचानकपणे धाड टाकल्यास अजूनही असंख्य हॉटेल्स अस्वच्छ असल्याचे समोर येण्याची शक्यता आहे. यापुढे एफडीएकडून या हॉटेलवर काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.