जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा कोणाला भेटण्यासाठी अगदी सहज एखादे हॉटेल ठरवले जाते. यामध्ये तरुणाईचा सहभाग सर्वात जास्त असल्याचे दिसते. पुण्यातील हॉटेल्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिशय नामांकित अशा हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे नुकतचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. वैशाली, रुपाली आणि कॅफे गुडलक यांसारखी हँगआऊटसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल्सचा या यादीत समावेश आहे. या हॉटेलचे भटारखाने अतिशय गलिच्छ असल्याचे एफडीएने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉटेलच्या स्वच्छतेबाबत एफडीएचे काही निकष असतात. हे निकष हॉटेल्सकडून पाळण्यात येतात का याची पाहणी करण्यासाठी एफडीएने अचानक पाहणी केली असता याठिकाणी अस्वच्छता असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सिझलर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या याना सिझलर्सचाही समावेश आहे. वैशाली हॉटेलच्या भटारखान्यात मोठ्या प्रमाणात कचरा होता, तसेच याठिकाणी अन्नपदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारी भांडीही खराब अवस्थेत असल्याचे या पाहणीत समोर आले आहे. आपल्याला चमचमीत पदार्थ बनवून देणारे शेफही स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. रुपाली हॉटेलची स्थितीही अशीच असल्याचे समोर आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaishali rupali cafe goodluck are the most dirty hotels from pune fda survey
First published on: 17-10-2018 at 18:23 IST