09 March 2021

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे २४ वाहनांची तोडफोड; तीन जण ताब्यात

टोळक्याने मध्यरात्री लोखंडी रॉडने केले नुकसान

सांगवी : पिंपरी-चिंचवड शहरात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र पुन्हा एकदा सुरु झाल्याचे चित्र आहे. काल मध्यरात्री अज्ञात टोळक्याने शहरात २४ वाहनं फोडली.

पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांच्या टोळक्याने सुमारे २४ वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या टोळक्याने मध्यरात्री मद्यप्राशन करून लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड केली आहे. दरम्यान, दोन किलोमीटरच्या परिसरात ही तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील तोडफोडीचे सत्र बंद होते. मात्र, ते आता पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात सुमारे २४ मोटारींची तोडफोड केल्याचं आज सकाळी समोर आलं असून तीन जणांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अद्याप वाहन तोडफोडीचे कारण अस्पष्ट आहे.

बुद्ध हौसिंग सोसायटी, प्रियदर्शनी नगर, ममता नगर, संगम नगर, ढोरे नगर अशा दोन किलोमीटरच्या परिसरात वाहनांची तोडफोड झाली आहे. आधीच लॉकडाउनमुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिकट बनलेली असताना अशा प्रकारे वाहनांच्या तोडफोडीचे नुकसान कोण भरुन देणार असा प्रश्न नागरिक करीत आहेत. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:20 pm

Web Title: vandalism of about 24 vehicles in pimpri chinchwad three people were detained aau 85 kjp 91
Next Stories
1 पुण्यात पोलीस निरीक्षक सायकलवर फिरुन कंटेंन्मेंट झोनमध्ये करतायत जनजागृती
2 टाळेबंदीतही जिल्ह्य़ात बेकायदा उत्खनन जोरात
3 भाज्यांचे दर घटले; सामान्यांना दिलासा
Just Now!
X