News Flash

सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम

यंदाच्या दिवाळीमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. मजूर अड्डय़ावरील मजुरांना फराळ वाटप आणि लहानग्यांच्या हस्ते औक्षण अशा विविध उपक्रमांचे आयोजन

| November 7, 2013 02:37 am

यंदाच्या दिवाळीमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे सीमेवरील जवानांना शुभेच्छापत्रे, दीपोत्सव, किल्ले तयार करा स्पर्धा, देवदासी महिलांकरिता भाऊबीज, मजूर अड्डय़ावरील मजुरांना फराळ वाटप आणि लहानग्यांच्या हस्ते औक्षण अशा विविध उपक्रमांचे आयोजन दिवाळीमध्ये करण्यात आले होते.
सैनिक मित्र परिवारातर्फे सीमेवरील जवानांसाठी शुभेच्छा पत्रे, शहिदांच्या पत्नी, मातांसमवेत भाऊबीज, लष्करी रुग्णालये व अपंग पुनर्वसन केंद्रांना सदिच्छा भेटी अशा उपक्रमांद्वारे कृतज्ञता दिवाळी साजरी करण्यात आली. मातृपितृ प्रतिष्ठान आणि श्री संत नारायण गुरू अभ्यासिका संस्कार वर्ग यांच्या वतीने महर्षिनगर येथील विठाबाई पुजारी उद्यान येथे पाच हजार पणत्या आमदार माधुरी मिसाळ व नगरसेविका मनीषा चोरबेले यांच्या हस्ते लावण्यात आल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेस क ोथरुड मतदार संघातर्फे  कामना वसाहत येथे रांगोळीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निमूर्लनाविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच दीपोत्सवही साजरा करण्यात आला.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे शाहीर हिंगे यांच्या स्मरणार्थ किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मोठय़ा गटात गडवेडे ग्रुप आणि छोटय़ा गटामध्ये तुषार खैरमोडे यांना प्रथम पारितोषिक मिळाले. साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने देवदासी महिलांकरिता भाऊबीज साजरी केली. महिलांना भाऊबीजेनिमित्त साडी आणि फराळ भेट देण्यात आला. तसेच ट्रस्टच्या वतीने बुधवार पेठेतील मजूर अड्डय़ावरील ३० मजुरांना लहान मुलांच्या हस्ते ओवाळून त्यांनाही फराळाचे वाटप करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2013 2:37 am

Web Title: various initiative of social obligation
टॅग : Diwali,Initiative
Next Stories
1 पुण्याच्या आजी-माजी नगरसेवकांचे उद्या स्नेहमीलन
2 गूढ उकलले: बेपत्ता तरुणांपैकी तिघांचे मृतदेह गाडीतच
3 बेपत्ता झालेल्या चौघांपैकी चिंतन बूच याचा मृतदेह सापडला
Just Now!
X