दिवंगत पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळ ट्रस्ट’च्या वतीने देण्यात येणारा ‘मुख्य पुरस्कार’ लोकमतचे संजीव उन्हाळे यांना जाहीर झाला आहे. तसेच आश्वासक पुरस्कार ‘लोकसत्ता’ च्या मुंबई आवृत्तीच्या आरती कदम (शहरी विभागासाठी), लोकसत्ताच्याच नगर आवृत्तीचे अशोक तुपे (ग्रामीण विभागासाठी), तर एबीपी माझा वृत्तवाहिनीचे नीलेश खरे यांना जाहीर झाला आहे.
मंडळाचे अध्यक्ष विलास जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात २८ एप्रिल रोजी ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ पत्रकारास वरुणराज भिडे यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. मुख्य पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, तर प्रत्येकी ५ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह हे आश्वासक पुरस्काराचे स्वरूप आहे.

political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
pm photo on electricity bill
वीज बिलावरील नेत्यांच्या छायाचित्रांना विरोध; समाजवादी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान