27 September 2020

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच

निगडीमध्ये पाच गाड्यांच्या काचा फोडल्या

पिंपरी-चिंचवडमधील निगडी, बौद्ध नगर झोपडपट्टी परिसरात अज्ञाताने चार ते पाच चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुरास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीमधील बौद्ध नगर येथे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या तब्बल ५ चारचाकी गाड्यांच्या काचा आज्ञाताने दगड मारुन फोडल्या. यात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दारूच्या नशेत अज्ञात व्यक्तीने हा प्रताप केला असावा, असा प्राथमिक अंदाज निगडी पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

यापूर्वी पिंपळे निलख या परिसरात काही समाज कंटकांनी कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने १३ गाड्यांची तोडफोड केली होती. यावेळी चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सांगवी, पिंपळे गुरव, नेहरू नगर, साने चौक, निगडी या ठिकाणी देखील वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 3:06 pm

Web Title: vehicles breakout incident in pimpri chinchwad
Next Stories
1 कर्जमाफीसाठी राज्यातून ३२ लाख अर्ज
2 गणेशोत्सवातील वर्गणी, देणगीच्या पूर्वपरवानगीचे शहरातून केवळ ५५ अर्ज
3 भाजपच्या ४ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
Just Now!
X