वाहनांची तोडफोड करण्याचे सत्र सुरू
पिंपरी-चिंचवड शहरात गुंडांकडून वाहनांची तोडफोड होण्याचे सत्र सुरू असताना शनिवारी (११ जून) रात्री खडकीतील इंदिरानगर भागात टोळक्याने धुडगूस घातला. नागरिकांना तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवून गुंडांनी पंधरा ते वीस दुचाकी वाहनांची तोडफोड केली. तोडफोड क रून पसार झालेल्या नऊजणांना खडकी पोलिसांकडून अटक करण्यात आली.
सोन्या बिलाड उर्फ अश्विन बळीराम साठे (२३), नरेश कृष्णा उपलवंत (२३), अल्लाउद्दीन इस्माईल शेख (१९, तिघे रा. इंदिरानगर वसाहत, खडकी), अनिकेत संजय कड (२१), शाहीद शौकत सय्यद (२०), अजिंक्य राजेंद्र ननावरे (२५), रोहित यादगिरी शेगुरे (२१), दया श्रीमंत गर्जे (२६), कुणाल बाळासाहेब पवार (२३, सर्व रा. दापोडी)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने यासंदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी साठे आणि त्याचे साथीदार दुचाकीवरून इंदिरानगर परिसरात आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. लोखंडी गजाने त्यांनी दुचाकी वाहनांची तोडफोड केली. रहिवाशांना शिवीगाळ करून त्यांना धमकाविले. त्यानंतर तक्रारदार महिलेला धमकावून आरोपी साठे तिच्या नातवाच्या अंगावर धावून गेला. साठे आणि त्याचे साथीदार तेथून पसार झाले. या घटनेमुळे रहिवासी भयभीत झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. रविवारी पहाटे साठे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी पकडले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र देशमुख तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगांव येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन गटांत झालेल्या वादातून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
orange cargo truck overturned at Buldhana
ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक