21 November 2019

News Flash

पुण्यात गाड्या पेटवण्याचे सत्र सुरुच; ७ दुचाकी जाळल्याने खळबळ

बालाजीनगर भागात हा प्रकार घडला असून यामध्ये तब्बल ७ दुचाकी पेटवून देण्यात आल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात गेल्या काही महिन्यांत दुचाकी जाळणाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे. अशीच घटना बालाजीनगर भागात घडली असून यामध्ये तब्बल ७ दुचाकी पेटवून देण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीनगर येथील ऐलोरा पॅलेस जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ७ दुचाकींना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी पोहोचेपर्यंत यामध्ये ७ दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.

या दुचाक्या कोणीतरी पेटवून दिल्या असाव्यात असा संशय या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

First Published on July 11, 2019 11:26 am

Web Title: vehicles fired incident happened again in pune last midnight in that 7 two wheelers fired aau 85
Just Now!
X