News Flash

पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग, हडपसरमधील घटना

आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही.

Vehicles, fire, Hadapsar, marathi news, marathi, Marathi news pape
आगीचे नेमके कारण अद्याप ही समजू शकलेले नाही.

हडपसर येथील अमरधाम स्मशानभूमी शेजारील पोलिस स्थानकाच्या नियोजित जागेत लावण्यात आलेली वाहने जळून खाक झाल्याची घटना घडली. यात चार कार आणि तीन रिक्षांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटना स्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत वाहने पूर्णपणे जळाली होती. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अग्निशमम दलाच्या आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील अमरधाम स्मशानभूमी शेजारी पोलीस स्थानकाची नियोजित जागा आहे. पोलिसांनी जप्त केलेली वाहने या ठिकाणी लावण्यात आली होती. ज्यात चार कार आणि तीन रिक्षाचा समावेश होता. मंगळवारी रात्री आग लागली. या आगीत वाहने पूर्णपणे जळून खाक झाली असून आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 11:57 am

Web Title: vehicles set on fire in hadapsar
Next Stories
1 पुण्यातून व्यावसायिक विमानाने हृदय दिल्लीला
2 थातूरमातूर कारवाईमुळे पालिका अडचणीत
3 अण्णा भाऊ साठे यांच्या घराच्या शोधाची कथा
Just Now!
X