ससून सर्वोपचार रुग्णालयातील खाटांची क्षमता १ हजार ७५० एवढी आहे. मात्र करोना रुग्णांसाठी के वळ ५२० खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकीकडे शहरातील सर्व रुग्णालयातील ८० टक्के  खाटा करोना रुग्णांसाठी राखीव असताना ससूनमध्ये हे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. ससून रुग्णलायातील खाटा करोनाबाधित रुग्णांसाठी वाढविल्यास जवळपास ५०० खाटा नव्याने उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, ससून रुग्णालयातील किमान ६० टक्के खाटा करोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी के ली आहे.

करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली. त्या वेळी ससून रुग्णालयातील खाटा वाढविण्याची मागणी त्यांनी के ली.

शहरात दैनंदिन २५ हजारांपेक्षा जास्त करोना संसर्ग चाचण्या होत असल्या तरी त्यातील सरकारी पातळीवरील आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या के वळ दोन हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण तातडीने वाढविण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली. दैनंदिन २५ हजार चाचण्यांपैकी २३ हजार चाचण्या खासगी प्रयोगशाळांतून होत आहेत. त्यामुळे संसर्गाची भीती जास्त आहे. खासगी प्रयोगशाळेत चाचणी के ल्यानंतर संबंधित रुग्ण विलगीकरणात राहात नाही, त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

ससून रुग्णालयात ‘पीएम के अर’फं डाच्या माध्यमातून ८६ कृत्रिम श्वसन यंत्र (व्हेंटिलेटर्स) उपलब्ध झाली होती. त्यापैकी ५४ यंत्रे सुरू असून ३४ यंत्रे नादुरुस्त आहेत, असे डॉ. तांबे यांनी सांगितले. महापालिके ला पीएम के अर फं डातून ३४ कृत्रिम श्वसन यंत्रे प्राप्त झाली होती. त्यापैकी ३३ यंत्रांचा वापर रुग्णांवरील उपचारासाठी के ला जात आहे, अशी माहितीही या बैठकीवेळी देण्यात आली.