News Flash

खडकी कॅन्टोंमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मनीष आनंद यांना अटक व सुटका

खडकी कॅन्टोमेन्टमध्ये विरोधात निविदा भरू नये म्हणून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून खडकी कॅन्टोंमेन्ट बोर्डाचे उपाध्यक्ष मनीष सुरेंद्र आनंद यांना सोमवारी लष्कर पोलिसांनी अटक

| June 19, 2013 02:32 am

खडकी कॅन्टोमेन्टमध्ये विरोधात निविदा भरू नये म्हणून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून खडकी कॅन्टोंमेन्ट बोर्डाचे उपाध्यक्ष मनीष सुरेंद्र आनंद (वय ३७) यांना सोमवारी लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. निविदा भरण्याच्या दिवशी गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून खडकी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ात आनंद यांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन महादेव यादव (वय ३०, रा. न्यू मोदीखाना, लष्कर) यांनी लष्कर पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली आहे. खडकी कॅन्टोंमेन्ट बोर्डाच्या वाहन प्रवेश करासाठी निविदा भरू नये, म्हणून ५ फेब्रुवारी २०१३ रोजी आनंद यांचे सहकारी तेजेद्रसिंह अहलुवालिया व इतर तिघे यादव यांच्या एम जी रस्त्यावरील विवेक एंटरप्रायजेस या कार्यालयात गेले. यादव व त्यांचा भाऊ यांनी निविदेबाबत काही विचारू नये, त्याच बरोबर निवादा भरल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, अहलुवालियाने त्याच्या फोनवरून मनिष आनंद यांना फोन केला. त्यावरून यादवला बोलण्यास लावले. त्या वेळी आनंद यांनी ही निविदा भरण्याचा विचार केल्यास यादव यांना  ठार मारण्याची धमकी दिली होती. या गुन्ह्य़ात आनंद यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. त्यांना लष्कर न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 2:32 am

Web Title: vice president of kirkee cant board arrested and released
Next Stories
1 आळंदीने मागितले पाणी, पण मिळाली गटारगंगा!
2 शिक्रापूरला पोलीस उपअधीक्षकाची मोटार ट्रेलरवर आदळून पाच ठार
3 चाकण आणि नवी मुंबईला विमानतळ होणारच – मुख्यमंत्री
Just Now!
X