16 December 2017

News Flash

विद्यार्थिनीशी लैंगिक चाळे करणारा उपप्राचार्य गजाआड

लोहगाव येथील माऊंट सेंट पॅट्रिक अॅकॅडमी स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील उपप्राचार्य सुरेश जॉनपॉल

पुणे | Updated: November 20, 2014 1:30 AM

 लोहगाव येथील माऊंट सेंट पॅट्रिक अॅकॅडमी स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील उपप्राचार्य सुरेश जॉनपॉल यांना विद्यार्थिनींशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. हा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. पीडित मुलींनी या घटनेची माहिती पालकांना व वर्ग शिक्षिकेला दिल्यानंतरही त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. मात्र, हा प्रकार पोलिसांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी संबंधित मुलींच्या पालकांशी चर्चा केल्यानंतर ते तक्रार देण्यास तयार झाले.

First Published on November 20, 2014 1:30 am

Web Title: vice principal arrested for girls sexual assault