News Flash

VIDEO : अवघ्या २७ सेकंदात कारचा चक्काचूर! ‘पुणे-मुंबई एक्सप्रेस वे’वर भीषण अपघात

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.

अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे

खोपोली हद्दीत पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील भीषण अपघातात कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अवघ्या २७ सेकंदात कारवरील ताबा सुटल्याने पुणे- मुंबई एक्सप्रेस वे’वर झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद झाला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली होती. त्यानंतर व्हिडिओतून या अपघाताची भीषणता समोर आली आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर गुरुवारी दुपारी कारचा भीषण अपघात झाला. यात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघाताचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला असून यातून अपघाताची भीषणता दिसून येत आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि गाडी लेन सोडून जात असताना पाठीमागील भरधाव कंटेनरने कारला चिरडले, त्यातच समोरील ट्रकला देखील धडकला.

या भीषण अपघातात कारमधून प्रवास करत असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात कंटेनर देखील उलटल्याने चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून कार चक्काचूर झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 11:06 am

Web Title: video car shattered in just 27 seconds terrible accident on pune mumbai expressway abn 97
Next Stories
1 हरिभक्तीच्या उत्साहात माउलींच्या चलपादुकांचे प्रस्थान
2 पुन्हा एकदा कलाकारांचा कट्टा भरावा
3 पालखी प्रस्थान सोहळ्यातील २३ वारकरी करोनाबाधित
Just Now!
X