पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. या ठिकाणी देशभरातून असंख्य मजूर कामासाठी येतात. मात्र करोना लॉकडाउनमुळे या मजुरांच्या हातचा रोजगार गेल्याने त्यांना गावी जाण्याची ओढ लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज पिंपरी-चिंचवडमधून २८६ परप्रांतीय मजूर एसटी बसने कर्नाटकला रवाना झाले आहेत.

आज (सोमवार)पासून परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडलं जाणार आहे. शहरातील वाकड परिसरातील २८६ मजुरांना एसटी बस द्वारे कर्नाटकच्या सीमेवर सोडण्यास बस रवाना झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात काही दिवसांपासून  मजुरांना खासगी बस तसेच आज सोमवारपासून एसटी बसने त्यांच्या राज्याच्या सीमारेषेवर सोडलं जात आहे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार परप्रांतीय मजुरांना आपल्या परिसरातील पोलीस ठाण्यात जाऊन नाव नोंदवायचं आहे. त्यानंतर पोलीस फोनद्वारे कळवून संबंधित व्यक्तीला किंवा कुटुंबाला एसटी बसमध्ये बसवून देणार आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.

Ajit Pawar gave a public confession Said Hooliganism in the industrial area
अजित पवारांनी दिली जाहीर कबुली; म्हणाले, ‘औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी…’
Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा
Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले

बस केवळ सीमारेषेपर्यंतच जाणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. या बसचे सॅनिटायझेशन करण्यात आले असून प्रत्येक व्यक्तीला सॅनिटायझर, फुडपॅकेट देण्यात आले. विशेष बाब म्हणजे यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी करून सोशल डिस्टसिंगचं पालन करत बसमध्ये बसवून देण्यात आलं आहे.

दरम्यान, शहरातील आणखी हजारो मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात जायचं आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला कंबर कसावी लागणार आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, वल्लभनगर बस आगार प्रमुख पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.