News Flash

करोना नियमांकडे दुर्लक्ष करत आमदार महेश लांडगे यांचा कार्यकर्त्यांसह डान्स!

याप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे यांनी करोना नियमांचं उल्लंघन केल्याचं एका व्हिडिओद्वारे समोर आले आहे. ६ जून रोजी त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा असून त्यापूर्वी काल (रविवारी) झालेल्या मांडव सोहळ्यात महेश लांडगे यांनी भंडारा उधळून डान्स केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क देखील लावला नव्हता. कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तींनी गर्दी करत जल्लोष केला. तसेच, यावेळी वाजंत्री, बैल जोड्यांच देखील आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी आमदारा महेश लांडगे यांना खांद्यावर घेऊन वाजंत्रीच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी एकच ठेका धरला होता. तर, आजूबाजूला भंडाऱ्याची उधळण होत होती. काही सेकंदाच्या डान्स मोबाईलमध्ये टिपण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

यावेळी करोना नियमांचे उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं. तर, सोशल डिस्टसिंगचा देखील फज्जा उडाला होता. त्यामुळे आता पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यासंबंधी काय कारवाई करणार? असा प्रश्न सर्वसमान्यांमधून उपस्थित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 12:34 pm

Web Title: video mla mahesh landge dance with ignoring corona rules msr 87 kjp 91
Next Stories
1 Corona Vaccine: पुणेकरानं लिहिलं फायझरला पत्र, चक्क सीईओनं दिलं उत्तर
2 मृत्यू दाखले मिळविताना नागरिक हैराण
3 करोना उपचारासाठी अधिक पैसे घेणाऱ्या डॉक्टरावर गुन्हा
Just Now!
X