27 February 2021

News Flash

Video: पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान ज्येष्ठ महिलेला महिला पोलिसांची मारहाण

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून दोन महिलांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पुणे : अतिक्रमणविरोधी कारवाईला विरोध करणाऱ्या ज्येष्ठ महिलेला महिला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली.

पुण्यातील हडपसर येथील मगरपट्टा रोडवर अतिक्रमण विभागाकडून दोन दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली. यावेळी या कारवाईला विरोध करणाऱ्या दोन महिलांना महिला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचे वृत्त आहे. यांपैकी एक ज्येष्ठ महिला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या महिलांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत माहिती देताना पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागप्रमुख माधव जगताप म्हणाले, शहरातील अनेक भागात अतिक्रमण विभागाकडून दररोज कारवाई केली जाते. त्यादरम्यान नागरिकांसोबत वादाचे प्रकार घडत असतात. हे वाद टाळण्यासाठी आम्ही पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करीत असतो. अशाच प्रकारे दोन दिवसांपूर्वी मगरपट्टा रोडवर ही अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. यावेळी ही घटना घडली.

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या येथील एका चहाच्या स्टॉलवर अतिक्रमण विभागाचे लोक कारवाई करीत असताना. हा स्टॉल चालवणाऱ्या सासू आणि सूनेने या कारवाईला विरोध केला तसेच त्यांची महिला पोलिसांसोबत वादवादीही झाली. त्यानंतर महिला पोलीस या दोघींनाही पोलीस व्हॅनमध्ये बसवत असताना त्यांनी विरोध केला आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर धाऊन गेल्या. तसेच त्यांनी पोलिसांवर दगडही फेकले. त्यामुळे पोलिसांनी आपल्या बचावासाठी हा पवित्रा घेतला.

या प्रकरणी मारहाण झालेल्या स्टॉलधारक सासू-सुनेवर मुंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना नंतर न्यायालयातही हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने या महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 1:28 pm

Web Title: video senior woman assaulted by police woman during anti encroachment in pune aau 85
Next Stories
1 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव कार लोखंडी बॅरिकेट्सला धडकली, चालक गंभीर
2 पुण्यात गाड्या पेटवण्याचे सत्र सुरुच; ७ दुचाकी जाळल्याने खळबळ
3 मराठी शिक्षणसक्ती कायद्याचा मसुदा २० ऑगस्टपर्यंत शासनाकडे
Just Now!
X