21 September 2020

News Flash

VIDEO: सोमवतीनिमित्त जेजूर गडावर चार लाख भाविकांकडून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’

खंडोबा गडावर गर्दीचा महापूर

‘येळकोट येळकोट जय मल्हार’

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेस सुमारे चार लाख भाविकांनी हजेरी लावली. पौष महिन्यातच सोमवती अमावस्या यात्रा असल्याने सारी जेजुरी नगरी रविवारपासूनच (३ फेब्रुवारी) भाविकांच्या गर्दीने फुलून गेली.
खंडोबा गडावर पालखी सोहळ्यासाठी खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, राजकुमार लोढा, अॅीड. प्रसाद शिंदे, अॅिड. अशोक सपकाळ, तुषार सहाणे उपस्थित होते. सोमवारी दुपारी एक वाजता पेशवे इनामदारांनी हुकूम करताच खांदेकरी-मानक?ऱ्यांनी पालखी उचलून खांद्यावर घेतली. सनई-चौघडय़ाच्या निनादात पालखी कऱ्हा स्नानासाठी निघाली. खंडोबा मंदिराला प्रदक्षिणा करून आल्यावर पालखीत खंडोबा-म्हाळसादेवीच्या मूर्ती ठेवण्यात आल्या. ‘जय मल्हार’चा जयघोष करत भाविकांनी भंडार-खोब?ऱ्याची मुक्त उधळण केल्याने सारा परिसर पिवळाधमक झाला. गडामध्ये गडाच्या तटबंदीवर, दीपमाळेवर मिळेल त्या ठिकाणी भाविक उभे राहिले होते.
पालखी खंडोबा गड उतरून छत्री मंदिर मार्गे कऱ्हा नदीवर स्नानासाठी नेण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता पालखीतील खंडोबा-म्हाळसादेवी यांच्या मूर्तीना विधिवत स्नान घालण्यात आले. अपुऱ्या पावसामुळे स्नानाच्या जागी पाणी उपलब्ध नसल्याने नाझरे धरणातून चार टँकर आणि अग्निशमन दलाच्या दोन गाडय़ांतून पाणी आणण्यात आले.

‘सदानंदाचा येळकोट’ हा जयघोष करीत भाविकांनी या पर्वणीचा आनंद लुटला. खंडोबा देवस्थानने भाविकांसाठी शुद्ध पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. सायंकाळी साडेसात वाजता ग्रामदैवत जानूबाईच्या भेटीला पालखी आणण्यात आली आणि रात्री उशिरा पालखी पुन्हा खंडोबा गडावर नेण्यात आली.


यात्रेत आलेल्या भाविकांनी भंडारा खोबरे मोठय़ा प्रमाणात खरेदी केले. गडाच्या प्रवेशव्दाराजवळ प्रचंड गर्दी झाली होती. चंगराचेंगरी होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेत कौशल्याने परिस्थिती हाताळली. कडेपठार या खंडोबाच्या मूळ ठिकाणीही पहाटेपासूनच दर्शनाच्या रांगा लागल्या होत्या. यात्रेसाठी मुंबई परिसरातून हजारो कोळी बांधव तीन दिवसांपासून जेजुरीत मुक्कामी आले होते. रस्त्यावर रांगोळ्या काढून महिलांनी पालखीचे स्वागत केले.

जेजुरी येथील खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेस चार लाख भाविकांनी हजेरी लावली. भंडार-खोबऱ्याची मुक्त उधळण केल्याने सारा परिसर पिवळाधमक झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 11:13 am

Web Title: video somvati amavasya jejuri 2019
Next Stories
1 मुलीला इंजिनीअर बनवण्याचं स्वप्न रेखाटणारा ६५ वर्षांचा बापमाणूस
2 पुण्यातील प्रसिद्ध वडापाव सेंटरवर कारवाई, विक्री थांबवण्याचे आदेश
3 पिकांची माहिती आता मोबाइल अ‍ॅपद्वारे गोळा होणार
Just Now!
X