शिक्षणासाठी ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने वसतिगृहसूची (वसतिगृह माहिती पुस्तिका) बनवण्यात येत असून, त्यासाठी जिल्ह्य़ातील संस्था व वसतिगृहांची माहिती पाठवण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
वाढती महागाई आणि पुरेशा आर्थिक पाठबळाचा अभाव यामुळे होतकरू विद्यार्थ्यांची मोठी कुचंबणा होते. अशा विद्यार्थ्यांना शहरातील विविध संस्थांतर्फे चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांची व सुविधांची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी ही माहिती पुस्तिका काढण्यात येणार आहे. यामध्ये वसतिगृह (अनुदानित, विनाअनुदानित, मुलींचे, मुलांचे, निवासी, अनिवासी) प्रवेश क्षमता, पत्ता, संपर्क आदी माहितीसह पाठवावे, असेही समितीतर्फे सांगण्यात आले आहे. माहिती पाठवण्यासाठी पत्ता- अच्युत शं. आपटे वसतिगृह, विद्यार्थी साहाय्यक समिती, १२८२/१/४, शिवाजीनगर, फग्र्युसन रस्ता. अधिक माहितीसाठी ०२०- २५५३३६३१ या क्रमांकावर संपर्क साधावा.