06 March 2021

News Flash

जेजुरीत देवस्थानच्या विरोधात ग्रामस्थांचे उपोषण

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थिस्मारकाची पूजा करून सकाळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला.b

मरतड देवस्थानचे विश्वस्त मंडळ मनमानी कारभार करत असल्याचा आरोप; भाविकांना सोयीसुविधा देण्यात अपयश

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीतील खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मरतड देवस्थानचे विश्वस्त मंडळ मनमानी कारभार करत असून भाविकांना सोयीसुविधा देण्यात मंडळ अपयशी ठरल्यामुळे विश्वस्त मंडळ तातडीने बरखास्त करावे, या मागणीसाठी शहर नागरिक हक्क कृती समितीच्या वतीने गडाच्या पायथ्याशी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थिस्मारकाची पूजा करून सकाळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. नागरिक हक्क कृती समितीचे अध्यक्ष राहुल मंगवानी, विक्रम माळवदकर, अनिल पोकळे, सचिन उपाध्ये, आनंद सोनवणे यांच्यासह अन्य दहा ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले. विरोधी पक्षनेते गणेश निकुडे, नगरसेवक हेमंत सोनवणे, अमोल सातभाई, तसेच गोिवद दीडभाई, अजयसिंह सावंत, संदीप जगताप, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, दिलीप मोरे, महेश आगलावे, प्रसाद अत्रे, कडेपठार देवसंस्थानचे सचिव सदानंद बारभाई, मल्हारराजे प्रतिष्ठानचे हरिभाऊ रत्नपारखी, रिझवान पानसरे, अजिंक्य जगताप, नगरसेविका साधना दीडभाई, आशा बारभाई, संतोष जठार आदींची या वेळी उपस्थिती होती. जेजुरी प्रहार अपंग संघटना, उघडा मारुती मित्र मंडळ, ब्राह्मण पुरोहित संघटना, शहर मुस्लीम बांधव संघटना, व्यापारी महासंघ, कुलवंत वाणी संघटना, महालक्ष्मी मित्र मंडळ आदी संघटनांनी उपोषणकर्त्यांना पािठबा दिला. अनेक भाविकांनी या वेळी देवस्थानच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या. प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

मुख्य मंदिरातील त्रिकाळ पूजेव्यतिरिक्त अन्य काळातील होणाऱ्या पूजाअभिषेकावरील बंदी उठविण्याबाबत विश्वस्तांचे दुर्लक्ष होत आहे. मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व व वास्तू संरक्षण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच गडावर जाण्यासाठी पुरेसा पायरी मार्ग असतानाही पश्चिम दिशेकडे नव्याने पायरी मार्गासाठी विश्वस्तांचा अट्टहास सुरू आहे. कडेपठार देवसंस्थान विलीनीकरणाचा निर्णय तसेच भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देणगीदानाचा अपव्यय आदी विषयांवर प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषणचा मार्ग स्वीकारल्याचे राहुल मंगवाणी यांनी सांगितले. जेजुरीच्या नगराध्यक्षा सुरेखा सोनवणे, अखिल गुरव संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अण्णा िशदे यांच्या उपस्थितीत सायंकाळी उपोषण संपविण्यात आले.

चच्रेची तयारी – डॉ. प्रसाद खंडागळे 

मुख्य खंडोबा मंदिरातील त्रिकाळ पूजेव्यतिरिक्त होणाऱ्या पूजाअभिषेकांमुळे दर्शनरांगेत भाविकांना खूप वेळ उभे राहावे लागत होते. म्हणून सहधर्मादाय आयुक्तांनी पूजाअभिषेकाला बंदी घातली असली, तरी हा नियम ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी यांना लागू नव्हता. त्याबाबत मी ग्रामस्थांशी चर्चा करून धर्मादाय आयुक्तांना बंदी उठविण्याबाबत पत्र दिले आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या मागणीचे पत्र देवसंस्थानकडे द्यावे. दोघांच्या चच्रेतून योग्य मार्ग काढू, असे विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे यांनी सांगितले.

कायदेशीर कारवाईची मागणी

दरम्यान, जेजुरीतील मरतड देवसंस्थानवर बिनबुडाचे व बदनामीकारक आरोप करून नागरिक हक्क कृती समितीचे अध्यक्ष शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडवीत आहेत. त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे पत्र मरतड देवसंस्थानने जेजुरी पोलीस ठाण्यात दिले आहे. उपोषणकर्त्यांवर योग्य ती कारवाई करावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 3:22 am

Web Title: villagers protest against jejuri devasthan committee
Next Stories
1 एसकेएफच्या कर्मचाऱ्यांची दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत
2 रॉकेलचा लाभ घेणाऱ्या गॅसधारकांवर कारवाई
3 दोन हजार रोपांच्या वाटपाचा उपक्रम
Just Now!
X