करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. या पाच दिवसात सुमारे साडेतीन हजार नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले. तर ८८ जणांची वाहनं पोलिसांनी जप्त केली. दरम्यान, उद्या रविवापासून शहरातील लॉकडाउन शिथील करण्यात आला आहे. विनामास्क, डबलसीट दुचाकी चालवणे, संचारबंदीचे उल्लंघन, नियम डावलून दुकाने खुली ठेवणे यासाठी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या चार दिवसांपासून अत्यंत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. तरीही ३ हजार ५२४ जणांनी नियमांचे उल्लंघन केले, या लोकांवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. तर अनेकांची वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. लॉकडाउनच्या या काळात नागरीक बिनधास्त दुचाकी आणि मोटारीतून फिरताना पाहायला मिळत आहेत.

सोमवारपासून शनिवारपर्यंत दाखल केलेले गुन्हे

  1. सोमवारी, १३ जुलै – ७४४ गुन्हे दाखल, ४५ वाहने जप्त
  2. मंगळवार, १४ जुलै – ७५२ गुन्हे दाखल
  3. बुधवार, १५ जुलै – ५५८ गुन्हे दाखल, १ वाहनं जप्त
  4. गुरुवार, १६ जुलै – ६३५ गुन्हे दाखल, ५ वाहनं जप्त
  5. शुक्रवार, १७ जुलै – ६११ गुन्हे दाखल, ३७ वाहनं जप्त
  6. शनिवार, १८ जुलै – २२४ गुन्हे दाखल
  7. एकूण – ३५२४ गुन्हे दाखल, ८८ वाहनं जप्त