News Flash

Video : मद्यधुंद अवस्थेत तरुणीने पुण्यातील हिराबाग चौकात भररस्त्यात झोपून, आरडाओरड करुन घातला धिंगाणा

हा व्हिडिओ पुण्यात तुफान व्हायरल झाला असून यावर एकच चर्चा सुरू झाली आहे.

Pune Drunk Girl Creates Ruckus On Tilak Road
या मुलीला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली

पुण्यातील स्वारगेटच्या दिशेने जाणार्‍या हिराबाग चौकात एका उच्चशिक्षित तरुणीने दारू पिऊन रस्त्यावर झोपून, आरडाओरड करुन धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आलाय. या तरुणीने रस्त्यावर झोपून गाड्या अडविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती तेथील एका स्थानिक व्यक्तीने पोलिसांना कळविताच, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबधित तरुणीची समजूत काढून तिला रस्त्याच्या कडेला नेण्यात आलं.

स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात रात्री साडेदहाच्या सुमारास ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल होती. रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांना गाड्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न ती करत होती. या तरुणीने घातलेला गोंधळ पाहून तिला पाहण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूला चांगलीच गर्दी जमली. यासंदर्भातील माहिती स्थानिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. खडक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत या मुलीला रस्त्यावरुन बाजूला काढले. नंतर पोलिसांनी या तरुणीला अधिक चौकशीसाठी पोलीस स्थानकानकामध्ये नेलं.

हा व्हिडिओ पुण्यात तुफान व्हायरल झाला असून यावर एकच चर्चा सुरू झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2021 8:45 am

Web Title: viral video pune drunk girl creates ruckus on tilak road svk 88 scsg 91
टॅग : Social Viral
Next Stories
1 सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाला गती
2 पुणे विभागाचा बारावीचा निकाल ९९.७५ टक्के
3 दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, रुग्णसंख्येत वाढ
Just Now!
X