निर्विवाद बहुमत असलेल्या राष्ट्रवादीला धक्का
पिंपरी पालिकेत अत्यल्प संख्याबळ असतानाही काँग्रेसचे विष्णुपंत नेवाळे यांची शिक्षण मंडळाच्या उपसभापतिपदावर वर्णी लागली. निर्विवाद बहुमत असूनही मंडळातील सध्याची परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याने राष्ट्रवादीचा दावेदार असतानाही काँग्रेसचा उपसभापती झाला.
मंडळातील तेरापैकी आठ सदस्य एका बाजूला तर उर्वरित सदस्य दुसऱ्या बाजूला आहेत. या आठमध्ये सहा राष्ट्रवादीचे तर दोन काँग्रेसचे आहेत. या आठ जणांची पक्षविरहित एकजूट असून मंडळात बहुमत आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार लक्ष्मण जगताप तसेच राष्ट्रवादीत असूनही पक्षापासून चार हात लांब असलेले माजी आमदार विलास लांडे यांचे नेतृत्व मानणारे हे आठ सदस्य पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना जुमानत नाहीत. सर्वाना संधी मिळावी म्हणून प्रत्येकी सहा महिन्यांचे सभापतिपद करण्याचा निर्णय या सदस्यांनी आपापसातच घेतला. त्यानुसार, धनंजय भालेकर, चेतन घुले यांनी सभापतिपद भूषवले. आता चेतन भुजबळ सभापती आहेत. उपसभापती नाना शिवले यांनी राजीनामा दिल्याने सोमवारी निवडणूक झाली. त्यासाठी काँग्रेसचे नेवाळे व श्याम आगरवाल तसेच राष्ट्रवादीचे शिरीष जाधव इच्छुक होते. मंडळातील संख्याबळाचा विचार करता ते आठ सदस्य ठरवतील, तेच होणार होते आणि त्यांचा उमेदवार नेवाळे होते. शेवटी नेवाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व सभापती चेतन भुजबळ यांनी जाहीर केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांचे नेवाळे हे कट्टर समर्थक आहेत. याशिवाय, टाटा मोटर्स कामगार संघटनेचे सक्रिय कामगार प्रतिनिधी आहेत. राष्ट्रवादीचा सदस्य इच्छुक असताना काँग्रेसचा सदस्य पदावर बसल्याने राष्ट्रवादीला हा धक्का आहे.

ubt shiv sena leader jyoti thackeray in yavatmal washim constituency tour
मविआ उमेदवाराच्या कार्यपद्धतीने पक्षांतर्गत नाराजी? -शिवसेना उबाठाच्या उपनेत्या…
ajit pawar
चावडी: अजितदादा आणि ईडी !
pratibha dhanorkar
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!
Congress state vice president Kishore Gajbhiye filed an independent nomination form in Ramtek Lok Sabha constituency
रामटेकमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी; गजभियेंचा वंचित कडून अर्ज