02 December 2020

News Flash

व्होल्वो ‘व्ही ४० क्रॉस कन्ट्री’ मोटार पुण्यात दाखल

व्होल्वोची ‘व्ही ४० क्रॉस कन्ट्री’ ही मोटार पुण्यातील ‘प्लॅनेट एक्सक्लुझिव’ या शोरूममध्ये शनिवारी दाखल झाली.

| June 23, 2013 02:30 am

व्होल्वोची ‘व्ही ४० क्रॉस कन्ट्री’ ही मोटार पुण्यातील ‘प्लॅनेट एक्सक्लुझिव’ या शोरूममध्ये शनिवारी दाखल झाली.
‘व्ही ४० क्रॉस कन्ट्री’ ही गाडी प्रीमियम कॉम्पॅक्ट प्रकारातील व्होल्वोची पहिली क्रॉस कंट्री गाडी आहे. २ लिटर क्षमतेचे पाच सिलेंडर इंजिन, ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, १५० हॉर्स पॉवर हे या गाडीचे वैशिष्टय़ आहे. ‘व्ही ४० क्रॉस कन्ट्री’ पुण्यातील एक्स शोरूम किंमत २८ लाख ५० हजार रुपये आहे.
यावेळी व्होल्वो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक टॉमस एर्नबर्ग यांनी सांगितले, ‘‘डिझाईन, फिचर्स, तंत्रज्ञान आणि सुरक्षा अशा सगळ्याच पातळीवर व्ही ४० क्रॉस कंट्री उत्तम आहे. या गाडीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विशेष प्रणालींची निर्मिती करण्यात आली आहे. अपघात टळावेत किंवा अपघात झाल्यास आघात कमी व्हावा, या दृष्टीने या गाडीची रचना करण्यात आली आहे.’’ भारतातील बाजारपेठ २०२० पर्यंत अधिक पक्की करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे संकेतही एर्नबर्ग यांनी यावेळी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 2:30 am

Web Title: volvo v 40 cross country enter in to pune
Next Stories
1 ‘वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने पुण्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ’
2 जैववैद्यकीय कचरा विल्हेवाटीवरून डॉक्टरांचा २७ जूनला पालिकेवर मोर्चा
3 नाटय़मय घडामोडीनंतर भोसरीत लांडे, कोतवाल यांच्यात थेट लढत
Just Now!
X