पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (२३ मे) होत असून मतमोजणी आणि निकालाची उत्सुकता लक्षात घेऊन यंदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आयोगाच्याच व्होटर हेल्पलाइन या अ‍ॅपद्वारेही मतमोजणीची माहिती आणि निकाल नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर पाहता येणार आहेत. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीअंती उमेदवारांना मिळणाऱ्या मतांची माहिती या अ‍ॅपवर मिळेल.

पुण्यासह राज्यात आणि देशभरात प्रशासनाने मतमोजणीची तयारी केली असून मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमे आणि मतमोजणी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणी कक्षाच्या आत आणि बाहेर केंद्रीय पोलीस राखीव दल (सीआरपीएफ), राज्य राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या उमेदवाराला मतमोजणीच्या प्रत्येक फेरीअंती किती मते मिळाली, याबाबतची माहिती मतदान कक्षातील व्यक्तींना तत्काळ समजणार आहे, तर या अधिकाऱ्यांकडून निवडणूक आयोगाला प्रत्येक फेरीनंतर निवडणुकीला उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराची विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेल्या मतांची माहिती कळवली जाणार आहे.

SBI refuses to disclose electoral bonds details
माहितीच्या अधिकारांतर्गत निवडणूक रोख्यांचा तपशील देण्यास SBI चा नकार, कारण काय?
mpsc result, mpsc latest news
एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
How much tax will be paid on the gift of 240 crores given by Narayan Murthy to his grandson
Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली

निवडणूक अधिकाऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने दिलेली माहिती निवडणूक आयोगाकडून आयोगाचे संकेतस्थळ आणि व्होटर हेल्पलाइन अ‍ॅपवर अपलोड करण्यात येणार आहे. व्होटर हेल्पलाइन हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकृत मोबाइल अ‍ॅप आहे. त्यामुळे निकालाची अधिकृत आकडेवारी या अ‍ॅपद्वारे सामान्य नागरिकांना मोबाइलवर पाहता येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी देण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवारांना मिळालेली मते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या व्होटर हेल्पलाइन या अ‍ॅपवर प्रसिद्ध केली जाणार आहेत. मोबाइलमध्ये हे अ‍ॅप असणाऱ्यांना प्रत्येक फेरीनंतर राज्यासह देशभरातील उमेदवारांना मिळालेली मते समजू शकतील.

– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी