05 July 2020

News Flash

मतदान केंद्रे विधानसभेला बदलण्याची शक्यता

विधानसभेला बदललेल्या मतदान केंद्रांबाबत आता मतदारांनी सजग होणे आवश्यक आहे.

दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी फटाके स्टॉल्सचा

आगामी विधानसभेसाठी शहरासह जिल्ह्य़ाची अंतिम मतदारयादी जिल्हा निवडणूक शाखेकडून तयार करण्यात आली आहे. मात्र प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रांची पुनर्रचना करणे आवश्यक असताना  तशी प्रक्रिया न केल्याने लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदाराचे नाव ज्या केंद्रात आले होते त्याच केंद्रात येत्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे केंद्र येईल, याची शाश्वती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याबाबत नागरिक आणि राजकीय पक्षांकडून विहित कालावधीत हरकती, सूचना न आल्याने यापुढे मतदान केंद्ररचनेत बदल होणार नसल्याचेही निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ३१ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली आहे. या यादीबाबत जिल्हा निवडणूक शाखेने सामान्य नागरिक, राजकीय पक्षांकडून सूचना, हरकती मागवण्यात आल्या होत्या. मात्र, हरकती, सूचना न आल्याने आता मतदान केंद्रांमध्ये कोणताही बदल होणार नाही.

अनेक मतदारांना मतदानाच्या दिवशी नेहमीच्या मतदान केंद्रात मतदान करता येणार नसून घरपासून दूरवरच्या किंवा नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी केंद्रात मतदान करावे लागणार आहे. आता मतदारांनी आक्षेप घेतला, तरी मतदान केंद्रांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असेही निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मतदारांनी अधिक काळजी घेणे आवश्यक

विधानसभेला बदललेल्या मतदान केंद्रांबाबत आता मतदारांनी सजग होणे आवश्यक आहे. अनेक मतदार मतदानाच्या दिवशी नेहमीच्या मतदान केंद्रात जाऊन नावे शोधतात आणि नाव न सापडल्यास मतदान न करताच घरी परततात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी आधीच आपले नाव आणि मतदान केंद्र तपासून घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 2:29 am

Web Title: voting center vidhansabha akp 94
Next Stories
1 आठ महिन्यात १३२ जणांचा अपघाती मृत्यू
2 पुणे – दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड, १० लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
3 हर्षवर्धन पाटील यांचा ‘तो’ फोटो काँग्रेसने दहा दिवसांनी झाकला
Just Now!
X