News Flash

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

राज्यातील आस्थापना, दुकाने, हॉटेल, आयटी कंपन्या, मॉल, रिटेलर या ठिकाणी काम करणाऱ्या कामगरांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली

| October 12, 2014 03:25 am

राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी पंधरा ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील आस्थापना, दुकाने, हॉटेल, आयटी कंपन्या, मॉल, रिटेलर या ठिकाणी काम करणाऱ्या कामगरांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.
उद्योगातील कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संपूर्ण दिवसाची सुट्टी देता येणे शक्य नसल्यास अशा आस्थापनामधील किंवा उद्योगामधील कामगारांना, आयटी कंपन्या, निर्यात व्यवयास, कंपन्यातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किमान दोन तासांची किंवा मतदानाचा हक्क बजावता येईल, अशा वेळेची सवलत देण्यात यावी. या सूचनांचे राज्यातील आस्थापना, दुकाने, हॉटेल, खाद्यगृह, औद्योगिक उपक्रम, आयटी कंपन्या, मॉल, रिटेलर यांच्या मालकांनी काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 3:25 am

Web Title: voting day holiday election
टॅग : Election,Holiday
Next Stories
1 बेटिंगच्या अ‍ॅपवरून तीन बुकींनी कमविला सव्वाकोटी रुपयांचा नफा
2 मिठाईत आढळले वाजवीपेक्षा अधिक खाद्यरंग
3 भाजपने टोलची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
Just Now!
X