राज्यभरातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा होऊन सहा महिने झाले तरी निकाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र परीक्षा परिषद शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार, असा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थी आणि पालक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

परीक्षा परिषदेतर्फे  पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातील जवळपास आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १६ फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्यात आली होती.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

शिष्यवृत्ती परीक्षेनंतर झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर होऊनही दोन महिने होऊन गेले आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या शिष्यवृत्ती परीक्षेपेक्षा जास्त असताना, परीक्षेदरम्यानच करोना संसर्ग सुरू झालेला असताना राज्य मंडळाकडून निकाल जाहीर करण्यात आला. मात्र परीक्षा परिषदेला अद्याप निकाल जाहीर करता आलेला नाही.

करोना संसर्गामुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत निकालाचे काम करता आले नाही. त्यामुळे निकाल जाहीर करता आला नाही. आता निकालाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. ऑक्टोबरमध्ये निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

– तुकाराम सुपे, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद