02 March 2021

News Flash

VIDEO: मद्यधुंद तरुणींचा चिंचवड पोलीस ठाण्यात धिंगाणा

चिंचवडमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथे दोन तरुणी आणि एक तरुण दुचाकीवर थांबले होते. गस्त घालणाऱ्या पोलिसांना बघताच त्या तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.

पोलीस ठाण्यात चौकशी केली असता त्या तरुणींनी अक्षरश: धिंगाणा घातला.

चिंचवडमध्ये मद्यधुंद तरुणींनी पोलीस ठाण्यात शिवीगाळ करत धिंगाणा घातल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद तरुणींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. स्मिता बाविस्कर, प्रिया पाटील आणि आकाश कोरे अशी या तिघांची नावे आहेत.

चिंचवडमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथे दोन तरुणी आणि एक तरुण दुचाकीवर थांबले होते. गस्त घालणाऱ्या पोलिसांना बघताच त्या तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यप्राशन केले असल्याने त्यांचा तोल गेला आणि तिघेही खाली पडले. यानंतर पोलिसांनी तिघांनाही पोलीस ठाण्यात नेले.

पोलीस ठाण्यात चौकशी केली असता त्या तरुणींनी अक्षरश: धिंगाणा घातला. पोलिसांनी प्रश्न विचारले असता,  तुम्ही कोण विचारणारे, का विचारणार, आम्ही दारू पिणारच अशा प्रकारचे उत्तर त्या तरुणी देत होत्या. पोलिसांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. हा सर्व प्रकार पोलिसांनी मोबाईलमध्ये चित्रित केला. शेवटी पोलिसांनी स्मिता बाविस्कर, प्रिया पाटील आणि आकाश कोरे या तिघांना अटक केली.

आकाश हा काळेवाडी येथील नढेनगर तर स्मिता बाविस्कर आणि प्रिया पाटील या निगडी आणि चिखली येथे राहात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघीही नृत्य कलाकार असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 1:44 pm

Web Title: watch video drunk girls creates ruckus in chinchwad police station
Next Stories
1 भटक्या कुत्र्यांचा हल्ला, पुण्यात चार वर्षांच्या मुलाला पडले १७ टाके
2 कोंडीमुक्त हिंजवडीसाठी ‘आयटी’ लढा
3 उद्योगांच्या यशस्वितेसाठी शेअर बाजारात नोंदणी आवश्यक!
Just Now!
X