पूर्व, पश्चिम भागातील पाणीपुरवठा उद्या बंद

महापालिकेची चांदणी चौकातील जलवाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे आणि लष्कर जलकेंद्र ते खराडी अंतर्गत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीतून गळती होत असल्यामुळे शहरातील पूर्व-पश्चिम भागातील पाणीपुरवठा गुरुवारी (५ सप्टेंबर) बंद राहणार आहे. या भागांना दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (६ सप्टेंबर) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

येथील टाकीवरील मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली आहे. जलवाहिनी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्यामुळे वारजे जलकेंद्र येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे भुसारी कॉलनी, परमहंसनगर, पाषाण, बावधनसह अन्य परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी (५ सप्टेंबर) बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

उजवी-डावी भुसारी कॉलनी, परमहंसनगर, भूगाव, बावधन, पाषाण, शास्त्रीनगर, बावधन, सूस टाकी, पाषाण गावठाण, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे, विधाते वस्ती, मरकुटे वस्ती, म्हाळुंगे गाव, सूस गाव, सूस रस्ता, मोहननगर आणि परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

लष्कर जलकेंद्र ते खराडी अंतर्गत टाकण्यात आलेली एक हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाण्याची गळती सुरू झाली आहे. त्यामुळे गळती थांबविण्याचे काम हाती घेण्यात आले असून हे काम गुरुवारी होणार असल्यामुळे खराडी, चंदननगर, वडगांवशेरी, सोमनाथनगर, गणेशनगर, खुळेवाडी, रक्षकनगर, चौधरी वस्ती, संघर्ष चौक, थिटे वस्ती, जुना मुंढवा बायपास रस्ता, खराडी बायपास, मारुतीनगर, ईऑन आयटी पार्क परिसर, राजाराम पाटीलनगर, झेन्सार आयटी परिसर, साईनाथनगर, माळवाडी, मतेनगर या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.