29 September 2020

News Flash

पुस्तक दिंडीच्या माध्यमातून पाणी बचतीचा संकल्प करण्याची गुढी

चिमुकल्यांच्या हस्ते पाणी बचतीचा संदेश देणारी गुढी.. ‘सण करू साजरे, माध्यम जरा वेगळे’ हे ब्रीद जपत तरुणाईने...

मैत्र युवा फाउंडेशनतर्फे गुढीपाडव्यानिमित्त पुस्तक दिंडी काढून शुक्रवारी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला.

पाणी बचतीचा संकल्प करीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग असलेली पुस्तक दिंडी.. पारंपरिक पेहरावात सहभागी झालेली तरुणाई.. चिमुकल्यांच्या हस्ते पाणी बचतीचा संदेश देणारी गुढी.. ‘सण करू साजरे, माध्यम जरा वेगळे’ हे ब्रीद जपत तरुणाईने गुढीपाडव्याच्या पारंपरिक सणाला सामाजिकतेचे भान देत मैत्र युवा फाउंडेशनने शुक्रवारी मराठी नववर्षांरंभ दिवस साजरा केला.
फाउंडेशनतर्फे गुढी मांगल्याची, गुढी पाणी बचतीची, गुढी साहित्याची, गुढी संस्काराची असा संदेश देत पुस्तक दिंडीचे आयोजन केले होते. कोथरूड बालसदन संस्थेतील अनाथ मुलींच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, मंगेश तेंडुलकर, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी, ‘चिंटू’कार चारुहास पंडित, बीएमसीसीचे प्राचार्य चंद्रकांत रावळ, डॉ. राजन नाईक, स्वानंद लोमटे, चिंतामणी पटवर्धन, कल्पना वाघ, तेजस्वी सेवेकरी, सुचेता फासे, अश्विनी नायर, फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे या वेळी उपस्थित होते. आचार्य अत्रे सभागृहापासून या पुस्तक दिंडीला प्रारंभ झाला. अश्वराज बँडपथक, फुलांनी सजविलेली पालखी आणि तरुणाईचा सहभाग, असे वैशिष्टय़ असलेल्या या दिंडीचा महाराणा प्रताप उद्यानासमोर समारोप झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 3:14 am

Web Title: water savings gudhi book
Next Stories
1 आपण भूमिकाच घेत नाही – नाना पाटेकर
2 ससूनमधील संपकरी डॉक्टर बाह्य़रुग्ण विभागातील सेवा सुरू करण्याची शक्यता
3 शहीद कर्नल महाडिक यांच्या घरी उभारली शौर्य गुढी
Just Now!
X