News Flash

धरणक्षेत्रात पावसाची दडी

पानशेत, खडकवासला धरणांची पातळी आणखी खाली

पानशेत, खडकवासला धरणांची पातळी आणखी खाली

मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर गेल्या महिनाभरात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला अशा चार प्रमुख धरणांपैकी टेमघर वगळता अन्य धरणक्षेत्रात पावसाने दडी मारली आहे. त्याचा धरणांमधील पाणीसाठय़ावर परिणाम झाला असून पानशेत आणि खडकवासला धरणांमधील पाणीपातळी खालावली आहे. दरम्यान, दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीसाठा शून्यावर असलेल्या वरसगाव आणि टेमघर या धरणांमध्ये पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, धरण क्षेत्रात पावसाने जोर धरला नसल्याने शहरासह जिल्ह्यतील सर्व धरणे अद्याप कोरडीच आहेत.

शहर आणि जिल्ह्य़ात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, धरण परिसरात अद्यापही तुरळक पाऊ स आहे. टेमघरमध्ये ०.१७, पानशेत २.७४ आणि खडकवासला धरणामध्ये ०.७० टीएमसी  पाणीसाठा आतापर्यंत झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. जलसंपदा विभागाने एक जूनपासून झालेल्या पावसाचा आढावा घेतला आहे. त्यानुसार टेमघर धरणाच्या परिसरात महिनाभरात ५१९ मिलिमिटर पाऊ स पडला आहे. वरसगाव आणि पानशेत धरणांच्या क्षेत्रात अनुक्रमे ३४८ व ३४६ मिलिमीटर, तर खडकवासला धरण क्षेत्रात १६६ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणक्षेत्रात ३६४ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. तर, नीरा देवधर आणि उजनीच्या क्षेत्रात सरासरी तीनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अन्य धरणांच्या क्षेत्रात पावसाने दडी मारली आहे, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

टेमघर आणि वरसगाव या धरणांमध्ये पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली असली, तरी वरसगाव धरण अद्यापही कोरडे असून या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा अद्यापही शून्य टक्के आहे. टेमघरमध्येही केवळ ०.१७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

 

* शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणात ०.१७, वरसगावमध्ये ०.००, पानशेतमध्ये २.७४ आणि खडकवासला धरणात ०.७० टीएमसी मिळून एकूण ३.६१ टीएमसी एवढा आतापर्यंतचा पाणीसाठा आहे.

वरसगाव धरणाच्या किरकोळ दुरुस्तीची कामे झाली आहेत. त्यामुळे पाणी साठविण्यात येत आहे. वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे खडकवासला धरणात समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही.   – पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला विभाग

 

               धरण                       पाणीसाठा

 • खडकवासला ०.७०
 • भामा आसखेड               २.५६
 • पवना १.८२
 • टेमघर ०.१७
 • वरसगाव ०.००
 • पानशेत २.७४
 • खडकवासला ०.७०
 • निरा देवधर १.१९
 • भाटघर २.९०
 • वीर १.२२
 • उजनी -१०.३५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 12:06 am

Web Title: water scarcity in pune 11
Next Stories
1 ‘पंढरीची वारी’ आता जगाच्या व्यासपीठावर
2 शहरबात पिंपरी : पुढचं पाठ, मागचं सपाट!
3 समाजमाध्यमातलं भान :  ‘पुणे मॅक्रोग्राफर्स’ सूक्ष्म छायाचित्रणाचा आगळा छंद
Just Now!
X