News Flash

पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे महापालिकेपुढे आव्हान

या दोन धरणातील पाणीसाठय़ावरच पुणेकरांना अवलंबून राहावे लागणार आहे.

खडकवासला साखळी प्रकल्पातील टेमघर आणि वरसगाव धरणाची दुरुस्ती लांबल्यामुळे महापालिकेला यापुढे पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वरसगाव धरणाची दुरुस्ती जून अखेपर्यंत पूर्ण न झाल्यास पुढील वर्षांच्या सुरुवातीला दुरुस्तीसाठी धरण पुन्हा रिकामे करावे लागण्याची शक्यता आहे. तर, पावसाळा संपल्यानंतर टेमघर धरण टप्प्याटप्प्याने रिकामे करण्यात येणार असल्यामुळे सद्य:स्थितीमध्ये पानशेत आणि वरसगाव या दोन धरणातील पाणीसाठय़ावरच पुणेकरांना अवलंबून राहावे लागणार आहे.

खडकवासला साखळी प्रकल्पातील टेमघर आणि वरसगाव या धरणांच्या दुरुस्तीचे काम जलसंपदा विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ही दोन्ही धरणे जलसंपदा विभागाने रिकामी केली आहेत. त्यापैकी टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम यंदा पूर्ण होणार नसून ते पुढील वर्षांपर्यंत चालू राहणार आहे. वरसगांव धरणाच्या दुरुस्तीचे काम ७५ टक्के पूर्ण झाले असून जून अखरेपर्यंत उर्वरित कामे पूर्ण होतील, असा दावा जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. जून अखेपर्यंत कामे पूर्ण न झाल्यास पुढील वर्षांच्या सुरुवातीला वरसगाव धरणाचे काम पुन्हा हाती घेण्यात येईल, असेही सांगितले जात आहे. या पाश्र्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.  शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वार्षिक साडेअकरा टीएमसी पाणीसाठा मंजूर झाला आहे. मात्र महापालिका मंजूर कोटय़ापेक्षा अधिक पाणी धरणातून उचलत असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे. मंजूर कोटय़ापेक्षा अधिक पाणी उचलत असल्यामुळे जलसंपदा विभागाकडून महापालिकेला इशाराही देण्यात आला आहे.

पावसाळ्यात  टेमघर धरणात पाणी साठविले जाणार असले तरी ऑक्टोबर नंतर टप्प्याटप्प्याने धरण रिकामे करण्यात येणार आहे. खडकवासला धरणाची क्षमता १.९८ टीएमसी असल्यामुळे पाणी साठविण्यासाठी हे धरण फारसे उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे पर्यायाने वरसगांव आणि पानशेत या दोन धरणांवरच पाण्यासाठी अवलंबून रहावे लागणार आहे. या दोन्ही धरणांची मिळून साठवणूक क्षमता २५ टीएमसी आहे. शहराची वाढलेली भौगोलिक हद्द, लोकसंख्या आणि आजूबाजूच्या गावांना करावा लागणारा पाणीपुरवठा लक्षात घेता साडेअठरा टीएमसी पाणी महापालिकेकडून घेण्यात येते. त्यामुळे यापुढे पाणी गळती, पाणी चोरीवर महापालिकेला नियंत्रण ठेवावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2018 3:15 am

Web Title: water scarcity in pune 4
Next Stories
1 पुणे, खडकी, देहूरस्ता कॅन्टोन्मेंटच्या विकासाला गती मिळणार
2 डीएसकेंच्या मुलाला शरण येण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
3 विघटन न होणाऱ्या प्लास्टिक, थर्माकोल उत्पादनांवर कारवाई होणार
Just Now!
X