पुण्याला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये मंगळवारी ३६.६० दशलक्ष घनमीटर (दलघमी) इतका पाणीसाठा शिल्लक असून, एकूण साठय़ाच्या तुलनेत हे प्रमाण ४.६८ टक्के आहे. धरणक्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने पाणीसाठय़ात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांमधून पुण्यासाठी पाणी पुरवले जाते. या धरणांचा एकूण उपयुक्त साठा ८२५ दशलक्ष घनमीटर इतका आहे. त्यात मंगळवारी सायंकाळी एकूण ३६.६० दशलक्ष घनमीटर इतका साठा होता. दोन दिवसांपूर्वी हे प्रमाण आणखी कमी होते. त्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी २२ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे साठय़ात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवणाऱ्या पवना धरणात ३०.३३ दलघमी ़इतका उपयुक्त साठा असून, हे प्रमाण १२.५९ टक्के आहे.
धरणांचा साठा पुढीलप्रमाणे (एकूण उपयुक्त साठा, कालचा उपयुक्त साठा व टक्केवारी या क्रमाने; साठा दलघमीमध्ये)-
खडकवासला               ५६        १८.२९          ३२.७१
पानशेत                     ३०१        १८.१०            ६
वरसगाव                   ३६३        ०.२२            ०.०६
टेमघर                        १०५          ०              ०