25 February 2021

News Flash

पुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे

पालकमंत्री अजित पवार यांची सूचना

पालकमंत्री अजित पवार यांची सूचना

पुणे : पुणे महापालिका आणि ग्रामीण भागाने काटकसरीने पाण्याचा वापर करावा. पुण्याच्या सध्याच्या पाणीकोटय़ात कपात न करता सद्य:स्थितीतील पाणीवापर कायम ठेवण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिल्या. तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जलसंपदा विभाग, शहर व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तरीत्या पाणीचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही पवार यांनी या वेळी दिले.

शहर आणि जिल्ह्य़ाच्या पाणीप्रश्नावर झालेल्या खास बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी या सूचना दिल्या. बैठकीनंतर ते म्हणाले, ‘पालकमंत्री म्हणून शहर व ग्रामीण भागाला समन्यायी पाणीपुरवठा के ला जाईल. पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. कालव्याजवळ बेकायदा वाहिन्या टाकू न पाणी चोरीचे प्रकार घडतात. ही पाणीचोरी रोखण्यासाठी जलसंपदा विभाग, विभागीय आयुक्त आणि पोलिस यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.’

दरम्यान, जलसंपदा विभागाने महापालिके कडून मंजूर कोटय़ापेक्षा अधिकचे पाणी वापरण्यात येत असल्याचे सांगितले. तर, लोकसंख्या वाढल्याने पालिके कडून काही ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. परिणामी वर्षांला १८.५८ अब्ज घनफू ट (टीएमसी) पाण्याची गरज असल्याचे महापालिके च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

‘शहराला भामा आसखेड धरणातून पाणी मिळत आहे.

त्यामुळे पाणीकोटा आणखी वाढवण्याची मागणी नाही. मात्र, सध्या आहे तेवढे पाणी पुणे शहरासाठी द्या’, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी के ली. ग्रामीण भागाला उन्हाळी आवर्तन भामा आसखेडमधून देण्याची मागणी जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी के ली.

..तर शहराला एक दिवसाआड पुरवठा

महापालिके त ३४ गावे नव्याने समाविष्ट झाल्याने शहराची लोकसंख्या ६३ लाखांवर गेली आहे. याबाबतची आकडेवारी महापालिका आयुक्त विक्रमकु मार यांनी या वेळी सादर के ली. त्यामुळे प्रतिवर्षी १८.५८ टीएमसी पाण्याची मागणीही त्यांनी के ली. मात्र, पुण्याकडून ९० लाख लोकांसाठी आवश्यक असलेले पाणी वापरण्यात येत आहे. आगामी काळात अशाचप्रकारे पाणी वापरल्यास पुण्याला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल, असा इशारा पवार यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 1:10 am

Web Title: water supply of pune city remain as it is says guardian minister ajit pawar zws 70
Next Stories
1 सहकारनगरमध्येही रस्ता रुंदीकरणाचा घाट
2 बिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीमध्ये तिसऱ्या वर्षी पुण्याच्या नावावर शिक्कामोर्तब
3 इंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग
Just Now!
X